अखेर अभिनेता पर्ल वी पुरीला मिळाला जामिन, अभिनेत्याला मिळाला मोठा दिलासा

मुंबई : 'नागिन ३' मालिकेमुळे लोकप्रिय झालेला अभिनेता पर्ल वी पुरीला मंगळवारी जामीन मिळाला आहे. त्यामुळे पर्लला मोठा दिलासा मिळाला आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोपावरून त्याच्याविरोधात वसई- विरार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पर्लला ४ जून रोजी अटक करण्यात आली होती.83426777पर्लला अटक केल्यानंतर त्याला ५ जून रोजी वसई येथील कोर्टात सादर करण्यात आले. त्यावेळी पर्लने केलेला जामिनाचा अर्ज फेटाळत, त्याला १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. त्यानंतर त्याने पुन्हा एकदा जामिनासाठी अर्ज केला होता तोदेखील कोर्टाने फेटाळून लावला होता.

अहमदनगरची सन्मिता धापटे शिंदे ठरली महागायिका

मुंबई: 'सूर नवा ध्यास नवा-आशा उद्याची' या रिअॅलिटी शोचा अंतिम सोहळा नुकताच पार पडला. यात विजेती कोण ठरणार याची सगळ्यांना उत्सुकता होती. अहमदनगरची सन्मिता धापटे शिंदे या पर्वाची विजेती ठरली आहे.महाराष्ट्रातूनच नाही तर देशभरातून १६ सुरेल गायिका 'सूर नवा ध्यास नवा' या स्पर्धेत दाखल झाल्या. करोनाच्या संकटकाळाला तोंड देत या १६ जणींनी सुरांचा हा मंच मोठ्या मेहनतीने सजवला, गाजवला आणि अधिकाधिक तेजोमय केला. या गायिकांमधून सहा जणींनी महाअंतिम फेरीत मानाचं स्थान मिळवलं. अहमदनगरची सन्मिता धापटे शिंदेने परीक्षकांसह प्रेक्षकांचेही मन जिंकत विजेतेपद मिळवले.

TRPच्या स्पर्धेत 'देवमाणूस' चौथ्या स्थानावर ; 'ही' मालिका ठरली अव्वल

मुंबई: लोकप्रियतेवरून मालिकेचा टीआरपी ठरतो आणि कोणती मालिका वरचढ ठरली, हे दर आठवड्याला टीआरपीवरून कळतं. काही आठवड्यांपासून देवमाणूस मालिका टीआरपीच्या रेसमध्ये अव्वल होती, मात्र आता देवमाणूस मालिकेला मागे टाकत 'मुलगी झाली हो' या मालिकेनं अव्वल क्रमांकावर झेप घेतली आहे.गेल्या काही दिवसांपासून मराठी टीव्ही मालिकांमध्ये वेगवेगळे ट्विस्ट आणि टर्न्स पाहायाला मिळत आहेत. प्रत्येक मालिका टीआरपीच्या स्पर्धेत अव्वल येण्यासाठी प्रयत्न करताना दिसतेय. यातच 'मुलगी झाली हो' ही मालिका या आठवड्यात पहिल्या क्रमांकाची मालिका ठरली आहे.

Indian Idol 12 च्या परीक्षकांच्या नाटकी प्रतिक्रिया पाहून चाहते भडकले, तिघंही झाले ट्रोल

मुंबई : 'इंडियन आयडल १२' या रिअॅलिटी कार्यक्रमावरून सातत्याने विविध वादंग निर्माण होत आहेत. काही दिवसांपूर्वी या कार्यक्रमातील स्पर्धकांना, त्यातील परीक्षकांना आणि निर्मात्यांना ट्रोल करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी परीक्षक नेहा कक्कर, हिमेश रेशमिया यांनी किशोर कुमार यांचे गाणे अतिशय वाईट पद्धतीने सादर केले म्हणून ट्रोल करण्यात आले. स्पर्धकांच्या संबंधित ज्या काही कथा, कहाण्या दाखवल्या जातात. त्यावर हे तीनही परीक्षक अत्यंत नाट्यमय प्रतिक्रिया व्यक्त करतात. ते पाहून हे तिघेहीजण पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आले आहेत.

हर हर महादेव! अभिनेते अजिंक्य देव यांचं छोट्या पडद्यावर दमदार पुनरागमन

मुंबई: स्टार प्रवाहवर लवकरच सुरु होत असलेल्या ‘जय भवानी जय शिवाजी’ मालिकेबाबत प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. स्वराज्यासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिलेदारांची शौर्यगाथा या मालिकेच्या रुपात उलगडणार आहे. या मालिकेतून सुप्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहेत. ते या मालिकेत बाजीप्रभू देशपांडे साकारणार आहेत. ही ऐतिहासिक भूमिका साकारण्यासाठी ते खुपच उत्सुक आहेत.अजिंक्य देव आपल्या भूमिकेविषयी सांगतात, 'माझ्या करिअरची सुरुवातच 'सर्जा' चित्रपटातील ऐतिहासिक व्यक्तिरेखेने झाली होती.