रंगभूमीशी नाळ जोडलेल्या प्रत्येक कलाकारानं बाप्पाला घातलंय 'हे' साकडं

सकारात्मक होण्यासाठी मदतनाटक सुरू होणार आणि आपण सगळे पुन्हा रंगभूमीशी एकरूप होणार. हे बाप्पा घडवून आणेलच. सध्याचं संकट फार मोठं आहे; पण आपली इच्छाशक्ती प्रबळ आहे. या संकटावर मात करण्याची शक्ती बाप्पाने प्रत्येकाला द्यावी. त्याची कृपा आहेच. ती लोकांमध्ये अजून दृढ व्हावी हे बाप्पाकडे मागणं आहे. लोकांनी सुदृढ आणि सद्गुणी व्हावं हीच इच्छा आहे. या नकारात्मक परिस्थितीत आपल्याला सकारात्मक होण्यासाठी मदत करावी.

रंगकर्मींचा संयम सुटतोय ; एका नव्या नाट्य चळवळीला सुरुवात

सुरज कांबळेराज्यातील करोनाचा संसर्ग आता हळूहळू कमी होऊ लागला आहे. पण, तरीदेखील नाटकांसाठी राज्य सरकारनं नाट्यगृहांचे दरवाजे उघडलेले नाहीत. व्यावसायिक नाट्यसृष्टीची अवस्था अत्यंत दयनीय असताना प्रायोगिक रंगभूमीदेखील मरणयातना भोगत आहे. तसंच तरुणांच्या कल्पकतेचं व्यासपीठ असणारी एकांकिकेची रंगभूमीदेखील आज शांत आहे. नाट्यप्रयोगांसाठी नाट्यगृह सुरु करण्याची मागणी वारंवार होतेय. पण, नाटकासाठी नव्हे तर राजकीय कार्यक्रमांसाठी नाट्यगृहाचे दरवाजे उघडले जात असल्यानं नाट्यवर्तुळात संतापाचं वातावरण आहे.

राजकीय कार्यक्रमांसाठी खुली ,मग नाटकांसाठीच नाट्यगृहं बंद का?

मुंबई टाइम्स टीमकाही दिवसांपूर्वी नाशिकमधील कालिदास नाट्यगृहात राजकीय नेते, कार्यकर्ते आणि लोकांच्या उपस्थितीत एक कार्यक्रम पार पडला. एकीकडे नाट्यगृहात नाट्यप्रयोग सादर करण्यासाठी राज्य सरकारनं निर्बंध लावले असताना राजकीय किंवा सामाजिक कार्यक्रमांसाठी नाट्यगृह का दिलं गेलं असा प्रश्न सर्वांना पडला आहे. या घटनेची दखल घेत बुधवारी, 'मुंटा'नं 'नाटकांसाठीही दारं उघडा' या शीर्षकांतर्गत वृत्त प्रसिद्ध केलं होतं. यामध्ये नाट्यसृष्टीतील रंगकर्मींनी आपली नाराजी नोंदवली.

...तोपर्यंत राज्यात नाट्यप्रयोग होणार नाहीत; रंगमंच कामगारांचा मोठा निर्णय

मुंबई: 'गेल्या वर्षीच्या लॉकडाउनच्या जखमेतून आम्ही अजून सावरलेलो नाहीत. कसेबसे दिवस ढकलत आहोत. आम्हाला चमचमीत जेवणाची आशा नाही. पण, दोन वेळ डाळ-भात पोटात जावा; हीच अपेक्षा आहे. वर्षाच्या सुरुवातीला तीन-चार महिने नाटकांचे प्रयोग लागले त्यातून दिवसाला मिळणाऱ्या मानधनातून घर चालत होतं. पण, करोनाच्या दुसऱ्या लाटेने तेदेखील हिरावून घेतलं. पुन्हा नाट्यगृह बंद केल्यानं मिळकत थांबली. आमच्या काही रंगमंच कामगारांच्या डोक्यावर कर्ज आहे, भाड्याचे घर, घरात लहान मुले आहेत. आम्ही जगायचं कसं?

नाट्यप्रेमींसाठी गुडन्यूज! कमी पैशात नाटक पाहता यावं म्हणून प्रशांत दामले यांचा अनोखा उपक्रम

मुंबई- मराठी चित्रपटसृष्टीला सुगीचे दिवस आले असं म्हणताना मराठी नाटकांकडे मात्र दुर्लक्ष होतं. मराठी प्रेक्षक हा मराठी चित्रपट पाहण्यासाठी जितका उत्सुक असतो तितकाच तो मराठी नाटक पाहण्यासाठीही उत्सुक असतो. परंतु, नाटकांची न परवडणारी तिकिटं त्याला नाट्यगृहांमध्ये जाण्यापासून अडवतात. सहकुटुंब नाटकाला जाणं हे सर्वसामान्य प्रेक्षकांच्या खिशाला न परवडण्यासारखं आहे.