आणि या पुढेही... टीका करणाऱ्यांना नुसरत जहांचं सणसणीत उत्तर

मुंबई : तृणमूल काँग्रेसची खासदर आणि बंगाली सिनेमातील अभिनेत्री नुसरत जहांच्या वैवाहिक आयुष्यावरून गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चा होत आहेत. तिच्या आणि निखिल जैनमधील वाद, यश दासगुप्तासोबतचे तिचे अफेअर आणि त्यानंतर तिची प्रेग्नंसी या सगळ्यांमुळे नुसरत खूपच चर्चेत आली आहे. नुसरतच्या खासगी आयुष्याची चर्चा आता सार्वजनिकरित्या होऊ लागली आहे. नुसरत जहां आणि निखिल जैन यांनी एकमेकांवर अत्यंत गंभीर आरोप लावले आहेत. 83542409निखिल आणि नुसरत यांनी एकमेकांवर केलेल्या आरोपप्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना नुसरत प्रेग्नंट असल्याची बातमी आली. इतकेच नाही तर नुसरतचे फोटो व्हायरल झाले आहेत.

TRPच्या स्पर्धेत 'देवमाणूस' चौथ्या स्थानावर ; 'ही' मालिका ठरली अव्वल

मुंबई: लोकप्रियतेवरून मालिकेचा टीआरपी ठरतो आणि कोणती मालिका वरचढ ठरली, हे दर आठवड्याला टीआरपीवरून कळतं. काही आठवड्यांपासून देवमाणूस मालिका टीआरपीच्या रेसमध्ये अव्वल होती, मात्र आता देवमाणूस मालिकेला मागे टाकत 'मुलगी झाली हो' या मालिकेनं अव्वल क्रमांकावर झेप घेतली आहे.गेल्या काही दिवसांपासून मराठी टीव्ही मालिकांमध्ये वेगवेगळे ट्विस्ट आणि टर्न्स पाहायाला मिळत आहेत. प्रत्येक मालिका टीआरपीच्या स्पर्धेत अव्वल येण्यासाठी प्रयत्न करताना दिसतेय. यातच 'मुलगी झाली हो' ही मालिका या आठवड्यात पहिल्या क्रमांकाची मालिका ठरली आहे.

सुशांतचं मुंबईतलं घर मिळतंय भाड्याने, मोजावी लागेल मोठी रक्कम

मुंबई- बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने १४ जून २०२० रोजी गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या जाण्याने सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. सुशांतच्या मृत्यूनंतर तो राहत असलेला वांद्रे येथील फ्लॅट पोलीस तपासाचा एक महत्वाचा भाग झाला होता. अनेकदा पोलीस अधिकारी तपासासाठी या घरात ये- जा करत. सुशांतच्या मृत्यूनंतर हा फ्लॅट रिकामा असल्याने आता घरमालकाने हा फ्लॅट भाड्याने देण्याचा विचार सुरू केला आहे. हे घर सी व्यू अपार्टमेन्टच्या दुसऱ्या मजल्यावर आहे. सुशांतने या घरात बरेच सकारात्मक बदल केले होते. समुद्रकिनारी असलेल्या या घरासाठी आता मालक भाडेकरुच्या शोधात आहे.

Video- जेव्हा अरबाज खानची परदेशी गर्लफ्रेंड मराठीत देते उत्तर

मुंबई: अभिनेता अरबाज खान त्याच्या लव्ह लाइफमुळे नेहमीच चर्चेत असतो. अभिनेत्री मलायका अरोरापासून घटस्फोट घेतल्यानंतर अरबाज खान इटालियन मॉडेल आणि अभिनेत्री जॉर्जिया अँड्रियानीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. सोशल मीडियावर या दोघांच्या नात्यांची बरेचदा चर्चा होताना दिसते. जॉर्जिया सोशल मीडियावर बरीच सक्रीय आहे आणि अनेकदा तिचे फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. आताही जॉर्जियाचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात ती चक्क मराठीत बोलताना दिसत आहे.