वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची जोरदार तयारी, २८ वनडे सामने खेळत होणार सज्ज

मुंबई: सध्या भारतीय क्रिकेट संघ बांगलादेशच्या दौऱ्यावर आहे, जिथे त्यांना एकदिवसीय मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला. तीन एकदिवसीय मालिकेत आतापर्यंत दोन सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये बांगलादेशने २-० अशी आघाडी घेतली आहे. भारताने प्रयत्न केले खरे पण ते अपुरे पडले आणि त्यामुळेच बांगलादेशसारख्या दुबळ्या संघाविरुद्धच्या पराभवानंतर आता भारतीय संघावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.चाहत्यांसह अनेक दिग्गज खेळाडू आता टीम इंडियाच्या खराब कामगिरीवर टीका करत आहेत. त्याचसोबत संघामध्ये दुखापतींचे सत्र वाढताना दिसत आहे.

कोणी कॅप्टन तर कोणी टी-२० मास्टर, तर कोणी ऑलराउंडर, पण तरीही IPL 2023 लिलावात राहणार हे खेळाडू अनसोल्ड

मुंबई: २०२३ सुरु होण्यापूर्वीच आयपीएलच्या नवीन हंगामाची तयारी जोरात सुरू आहे. २३ डिसेंबरला खेळाडूंचा लिलाव होणार आहे. या लिलावासाठी जगभरातून ९९१ खेळाडूंनी आपली नावे नोंदवली आहेत. यामध्ये भारताचे ७१४ आणि परदेशातील २७७ खेळाडू आहेत. संघ यातील खेळाडूंची निवड करतील आणि त्यांच्यावर बोली लावतील. यावेळी हा एक मिनी लिलाव आहे आणि म्हणूनच तो काही तासांत संपेल.

बीसीसीआयने भारतीय संघात केला मोठा बदल, तिसऱ्या वनडे सामन्यासाठी घातक खेळाडूचा समावेश

चितगाव: भारत आणि बांगलादेशमध्ये सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना १० डिसेंबरला चितगाव येथे जहूर अहमद चौधरी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या मालिकेमध्ये भारतीय संघ अजूनही विजयाच्या प्रतीक्षेत आहे.तर या सामन्यापूर्वी टीम इंडियामध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. शेवटच्या वनडेसाठी बीसीसीआयने एका शानदार गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाचा संघात समावेश केला आहे. बांगलादेशविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या शेवटच्या सामन्यासाठी बीसीसीआयने भारताचा धाकड गोलंदाज कुलदीप यादवचा टीम इंडियाच्या संघात समावेश केला आहे.

विश्वचषकापूर्वी भारतीय महिला संघासमोर ऑस्ट्रेलियाचे तगडे आव्हान, आजपासून सुरु होणार लढत

मुंबई: दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या महिला टी-२० विश्वचषकापूर्वी भारतीय महिला क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत तयारी अधिक मजबूत करण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना ९ डिसेंबर रोजी मुंबईत खेळवला जाणार आहे. टी-२० विश्वचषक स्पर्धेला केवळ दोन महिने शिल्लक असताना, या पाच सामन्यांनंतर, हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघाला त्यांची किती तयारी झाली आहे याचा अंदाज येणार आहे.

पाकिस्तान दौऱ्यावर इंग्लंडचा काळजाचा ठोका चुकला, मुल्तानमधील हॉटेलजवळ झाला गोळीबार

मुलतान: इंग्लंडचा संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहे. इंग्लंडचा संघ १७ वर्षांनंतर कसोटी मालिका खेळण्यासाठी पाकिस्तानाला पोहोचला आहे. उभय संघांमध्ये तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे, त्यातील दुसरा सामना आजपासून म्हणजेच १० डिसेंबरपासून सुरू होणार आहे. दरम्यान, इंग्लंडचा संघ ज्या हॉटेलमध्ये थांबला आहे, त्या हॉटेलजवळ गोळीबार झाल्याची एक मोठी बातमी समोर आली आहे. गुरुवारी मुल्तानमध्ये इंग्लंडचा संघ ज्या हॉटेलमध्ये थांबला आहे. त्या हॉटेलजवळ गोळीबार झाल्याची बातमी आली. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती मिळाली नाही.