आजपासून हॉलमार्किंगचे दागिने; जाणून घ्या हॉलमार्किंगची नियमावली आणि त्याचे फायदे

मुंबई : देशभरात आजपासून सोन्याच्या दागिन्यांसाठी हॉलमार्किंग बंधनकारक झाले आहे. केंद्र सरकारने आजपासून हा नियम लागू केला आहे. यापुढे ग्राहकांना हॉलमार्क असलेले दागिनेच उपलब्ध होणार आहेत. हॉलमार्किंगमुळे सोन्याची शुद्धता ओळखणं सोपं होणार असून त्यातून होणाऱ्या फसवणुकीला चाप बसणार आहे.

डेअरी उद्योगात गुंतवणूक; दक्षिण भारतातील डोडला डेअरीची उद्यापासून समभाग विक्री

मुंबई : डोडला डेअरी लिमिटेडची इनिशिअल पब्लिक ऑफरिंग १६ जून २०२१ रोजी खुली होणार आहे. या ऑफरचा प्राइस बॅण्ड प्रति इक्विटी शेअर ४२१ ते ४२८ रुपयांदरम्यान निश्चित करण्यात आला आहे. किमान ३५ इक्विटी शेअर्स व त्यानंतर ३५ च्या पटीत इक्विटी शेअर्ससाठी बोली लावता येणार आहे. 'आयपीओ'तून ५२० कोटी उभारण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.

सोने महागले ; चार सत्रातील घसरणीला लागला ब्रेक, जाणून घ्या आजचा भाव

मुंबई : नफावसुलीने मागील चार सत्रात मोठी घसरण अनुभवलेल्या सोन्याच्या किमतींनी आज यु-टर्न घेतला. सकाळच्या सत्रात सोन्याच्या किमतीत १५० रुपयांची वाढ झाली. सोने तेजीत असले तरी दुसरी बाजूला चांदीवर दबाव कायम आहे. आज चांदीच्या किमतीत ६०० रुपयांची घसरण झाली आहे.

एसव्हीसी बँंकेच्या नफ्यात वाढ; करोना संकाटात केली दमदार कामगिरी, लाभांश देण्याची शिफारस

मुंबई : सहकार क्षेत्रातील अग्रगण्य एसव्हीसी को-ऑपरेटिव्ह बँक लि. (एसव्हीसी बँक) यांनी मार्च २०२१ रोजी संपलेल्या वर्षाचा आर्थिक निकाल जाहीर केला. नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हे निकाल मंजूर करण्यात आले. बँकेची दमदार कामगिरी लक्षात घेता संचालक मंडळाने या वर्षाकरिता १२ टक्के लाभांश देण्याची शिफारस केली असून ह्या बाबत निर्णय वार्षिक सर्वसाधारण सभेत सदस्यांच्या मंजुरीने घेतला जाणार आहे. ३१ मार्च २०२१ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात एसव्हीसी बँकेने १५०.२१ कोटी निव्वळ नफा (PAT) नोंदविला. गत वर्षी निव्वळ नफा रु. १४२.०१ कोटी इतका होता.

मेहुल चोक्सीला रक्तदाब आणि हायपर टेन्शन ; न्यायालयात अनुपस्थिती, सुनावणी तहकूब

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी मेहुल चोक्सीचा रक्तदाब वाढला आहे. तो सध्या हायपर टेन्शनमध्ये असल्याचा दावा चोक्सीच्या वकिलांनी केला. त्यामुळे डॉमिनिका कोर्टाने सुनावणी २५ जून २०२१ पर्यंत तहकूब केली आहे. यापूर्वीच डॉमिनिकन हायकोर्टाने मेहुल चोक्सीला जामीन देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आणखी काही दिवस मेहुल चोक्सीला तुरुंगातच काढावे लागणार आहेत.मेहुल चोक्सीच्या जामीन अर्जावर १४ जून रोजी सुनावणी होणार होती, मात्र या सुनावणीला चोक्सी अनुपस्थित राहिला. उच्च रक्तदाब आणि हायपर टेन्शनने तो सध्या त्रस्त आहे, असा दावा चोक्सीच्या वकिलांनी न्यायालयात केला.