गलवान संघर्षाला एक वर्ष पूर्ण; प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ चीनची आगळीक सुरूच!

बीजिंग: भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक संघर्षाला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. या संघर्षानंतर दोन्ही देशातील तणाव शिगेला पोहचला होता. तणाव निवळण्यासाठी दोन्ही देशांमध्ये लष्करी पातळीवर चर्चा सुरू आहे. चर्चेच्या जवळपास ११ फेऱ्या झाल्यानंतरही परिस्थिती 'जैसे थे'च आहे. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ अतिरिक्त बांधकाम केले असल्याचे समोर आले आहे. यामध्ये चीनच्या सैनिकांच्या राहण्याची व्यवस्थादेखील आहे. त्याशिवाय या भागांमध्ये रस्ते, बंकर, पायाभूत सुविधा, रुग्णालयेदेखील उभारण्यात आली आहेत.

उजव्या 'क्रांती'ची स्वप्ने पाहणारा अटकेत; ३ डी तंत्रज्ञानाने तयार करणार होता शस्त्रे

लंडन: ब्रिटनमधील सेंट्रल लंडनमधील कोर्टात एक अजब खटला सुरू आहे. या खटल्यातील आरोपी १८ वर्षांचा असून त्याला उजव्या विचारांची क्रांती करायची होती. एसेक्समध्ये राहणाऱ्या मॅथ्यू क्रोनजेगर या तरुणाने आपण ज्यू आणि मुस्लिम विरोधी असल्याचे सांगितले आहे. क्रोनजेगरने साठा करण्यासाठी बंकरच्या नियोजनासह ३डी तंत्रज्ञानाच्या मदतीने दोन शस्त्रे बनवण्यासाठी ऑर्डर दिली होती. क्रोनजेगरने मागील वर्षी ३१ ऑक्टोबर आणि १९ डिसेंबर दरम्यान शस्त्रे निर्मिती करण्यासाठी आवश्यक असलेला कच्चा माल खरेदी करण्यासाठी निधीदेखील हस्तांतरित केला होता.

अफगाणिस्तानमध्ये तालिबानला धक्का; दोन दिवसांत १७२ दहशतवाद्यांचा खात्मा

काबूल: अफगाणिस्तानमध्ये तालिबानला मोठा धक्का बसला आहे. अफगाणिस्तानच्या सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत दोन दिवसांत १७२ तालिबानी दहशतवादी ठार झाले आहेत. अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने ही माहिती दिली. तालिबानच्या विरोधात अफगान राष्ट्रीय संरक्षण आणि सुरक्षा बलाने (एएनडीएसएफ) विशेष मोहीम राबवली. अफगाण सैन्याने दिलेल्या माहितीनुसार, नानगड, कंधार, फरियाब, निमरुज, बदख्शां आणि तखार प्रांतांमध्ये एएनडीएसएफ सुरू केलेल्या कारवाईत १७२ तालिबानी अतिरेकी ठार झाले. तर, १०० हून अधिक जखमी झाले आहेत.

China Taishan plant leak जगाला टेन्शन? चीनमध्ये अणू प्रकल्पातून किरणोत्सारी पदार्थाची गळती!

बीजिंग: चीनमधील एका अणू प्रकल्पात झालेल्या गळतीमुळे जगभरात खळबळ उडाली आहे. ही गळती एक आठवड्यापूर्वीच झाली होती. ही घटना चीनने जगापासून लपवून ठेवली असल्याचे समोर आले आहे. या अणू प्रकल्पाच्या उभारणीत फ्रान्समधील पॉवर ग्रुप ऑफ ईडीएफ या कंपनीची ३० टक्के भागिदारी आहे. ईडीएफने या गळतीबाबत आपल्याकडून स्वतंत्र चौकशीला सुरुवात केली आहे. मात्र, अद्यापही या अणू प्रकल्पातील गळतीच्या तीव्रतेबाबत अधिक माहिती समोर आली नाही.

बापरे, करोनाविरोधात 'एवढी' प्रचंड मदत!; सोशल मीडियावर अमेरिका ट्रोल

वॉशिंग्टन: करोनाच्या संसर्गाशी दोन हात करण्यासाठी अमेरिकेने गरीब, विकसनशील देशांना मदतीचा हात देऊ केला आहे. अमेरिकेने यासाठी वॅक्सीन डिप्लोमसीचाही मार्ग अवलंबला आहे. आपल्या देशातील बहुतांशी नागरिकांचे लसीकरण केल्यानंतर अमेरिका इतर देशांना लस पुरवठा करणार आहे. तर, दुसरीकडे करोनाविरोधातील मदतीवरून अमेरिकेची सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे. अमेरिकेने कॅरेबियन देश त्रिनिदाद अॅण्ड टोबँगोला करोना लशीच्या ८० कुप्या पाठवल्या आहेत. अमेरिकन दूतावासाकडून या मदतीची माहिती सोशल मीडियावरून देण्यात आली. त्यावरून नेटिझन्सचे अमेरिकेची खिल्ली उडवली. यामध्ये चिनी पत्रकारांनीही उडी घेतली.