Ayodhya Land Scam : 'हत्या झाली तरी बेहत्तर...', आप खासदाराचा भाजपवर निशाणा

नवी दिल्ली : अयोध्येत श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टवर जमीन घोटाळ्याचा आरोप करणारे आम आदमी पक्षाचे राज्यसभेचे खासदार संजय सिंह यांनी मंगळवारी आपल्या घरावर अज्ञातांकडून हल्ला झाल्याचा आरोप केला आहे. 'माझी हत्या झाली तरी बेहत्तर पण मंदिरातलं दान चोरी होऊ देणार नाही', असं म्हणत संजय सिंह यांनी अज्ञातांकडून आपल्या घराच्या पाटीवर काळं फासल्याचं म्हटलंय. यावेळी त्यांचा निशाणा भाजपवर होता. 'माझ्या घरावर हल्ला झाला आहे. भाजपावाल्यांनो कान खुले ठेऊन ऐका... प्रभू श्री रामाच्या नावावर मंदिरातील दानाची चोरी होऊ देणार नाही...

चिराग यांच्या हातून पक्षाध्यक्ष पदही निसटलं; दुसरीकडे बंडखोर खासदार निलंबित

पाटणा : लोक जनशक्ती पक्षात पडलेल्या दुफळीत जोरदार घमासान युद्ध सुरु असल्याचं दिसतंय. एकीकडे पशुपती कुमार पारस यांच्या गटानं चिराग पासवान यांना अध्यक्ष पदावरून दूर केलंय. तर दुसरीकडे चिराग पासवान यांनी पाच बंडखोर आमदारांना निलंबित करण्याची घोषणा केलीय. पारस गट जोरात मंगळवारी, चिराग यांचे काका पशुपती कुमार पासर यांच्या गटानं चिराग पासवान यांना संसदीय दलाच्या नेते तसंच पक्षाध्यक्ष पदावरून हटवलंय. त्यांच्याऐवजी सूरजभान यांची कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलीय.

पक्षनेतृत्वाची भेट न घेताच सचिन पायलट दिल्लीतून उत्तराखंडात

हरिद्वार : राजस्थानात अशोक गेहलोत सरकारविषयी आपल्या मनातील असंतोष पक्ष नेतृत्वापर्यंत पोहचवण्यासाठी दिल्लीत दाखल झालेले काँग्रेसचे नेते आज अचानक उत्तराखंडात दाखल झाले. गेले चार दिवस दिल्लीत मुक्काम ठोकूनही राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांची पक्ष नेतृत्वाशी भेट होऊ शकली नाही, हे विशेष. काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सचिन पायलट आज दिल्लीहून जयपूरला दाखल होतील अशी शक्यता वर्तवण्यात येत असतानाच ते अचानक उत्तराखंडातील मंगलौरमध्ये दाखल झालेले दिसले.

भाच्याची गाडी रोखली म्हणून... महिला आमदारानं पोलिसाच्या कानशिलात लगावली!

बांसवाडा, राजस्थान : राजस्थानच्या एका महिला आमदाराच्या दादागिरीनं पोलीस विभागात नाराजीचं आणि संतापाचं वातावरण दिसून येतंय. या महिला आमदारानं एका हेड कॉन्स्टेबलच्या कानाखाली मारल्याचा आरोप करण्यात येतोय. महिला आमदाराची दादागिरी पोलिसांनी आपल्या भाच्याची गाडी अडवण्यावरून महिला आमदार नाराज झाल्या होत्या. यामुळे, गाडी थांबवून नियमाप्रमाणे दंड वसूल करणाऱ्या पोलीस शिपायावर रागावलेल्या महिला आमदारानं चक्क हात उगारला. या प्रकरणात महिला आमदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बांसवाडा जिल्ह्याच्या कुशलगढ इथं ही घटना घडलीय.

Ayodhya Land Scam: अयोध्येत कोणताही जमीन घोटाळा नाही, योगींचा निर्वाळा

अयोध्या : अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या भव्य राम मंदिराच्या जमीन खरेदी घोटाळ्याच्या आरोपांची मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही गंभीरतेनं नोंद घेतलीय. यासंबंधी मुख्यमंत्री योगींनी जिल्हाधिकाऱ्यांकडून संपूर्ण माहिती मागवली आहे. अधिकाऱ्यांनी जमीन खरेदीशी नगडीत कागदपत्रं मुख्यमंत्र्यांसमोर ठेवले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी राम जन्मभूमी ट्रस्ट, अयोध्येचे जिल्हाधिकारी तसंच आयुक्तांकडून या प्रकरणाची माहिती घेतली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीवर योगी आदित्यनाथ संतुष्ट असल्याचं सांगण्यात येतंय.