म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद: ट्रकचा पहारा देणाऱ्या दोघांना मारहाण करून लूटमार करणाऱ्या रिक्षा चालकासह तिघांना चिकलठाणा पोलिसांनी पाठलाग करून अटक केली. ही घटना शनिवारी पहाटे जालना रोडवरील हिरापूर शिवारातील हॉटेल साईकृपा समोर घडली. विशेष म्हणजे पोलिसांना घटनेची माहिती देताच, त्यांनी अवघ्या पाच ते सहा मिनिटांत घटनास्थळ गाठले होते.शेख गफ्फार शेख सत्तार (वय ३१, रा. रहेमानिया कॉलनी, ह. मु. नारेगाव), शेख तौसीम शेख रफीक (वय ३१, रा. अजीज कॉलनी, नारेगाव) आणि नासिर पठाण युनूस पठाण (वय २९, रा.