नागपूर: अडीच हजार कोटींचे खोटे व्यवहार उघड; ११ बोगस कंपन्यांचा पर्दाफाश

म. टा. प्रतिनिधी, नागपूर: सध्या संपूर्ण देशभर बनावट देयकांद्वारे इनपुट टॅक्स क्रेडिट (आयटीसी) मिळविणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे. त्या अंतर्गत जीएसटी महासंचालनालयातील गुप्तचर विभागाच्या (डीजीजीआय) नागपूर झोनल युनिटने दिल्ली-एनसीआर, नवी दिल्ली आणि फरिदाबादेतील ११ बनावट कंपन्यांचा पर्दाफाश केला आहे. या कंपन्यांनी २५३६ कोटींचे खोटे आर्थिक व्यवहार दाखवून ४६१.३४ कोटी रुपयांचा आयटीसी मिळविला आहे. ११ पैकी १० कंपन्या दिल्ली-एनसीआर येथील आहेत. या कंपन्यांनी नाशिक आणि धुळ्यातील कंपनीला पुरवठा केल्याचे दाखवून आर्थिक गैरव्यवहार केला. ज्याद्वारे सुमारे ३१५.६५ कोटींचा आयटीसी मिळविण्यात आला.

हेरिटेज संवर्धन नियम का केले नाहीत?

म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूरदेशाच्या मध्यभागी असलेल्या झिरो माइलच्या संवर्धनासाठी विशेष नियम का तयार केले नाहीत, अशी परखड विचारणा करीत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महापालिका आयुक्तांना समन्स बजावला होता. त्यानुसार मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. उच्च न्यायालयात हजर झाले. त्यांना आता १८ जानेवारीपर्यंत उत्तर सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे.झिरो माइलच्या दुरवस्थेची दखल घेत हायकोर्टाने जनहित याचिका दाखल करून घेतली. त्यावर न्या. सुनील शुक्रे आणि न्या. अविनाश घरोटे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांच्याविरोधात गुन्हे

म. टा. प्रतिनिधी, नागपूर: नागपूर सुधार प्रन्यासच्या घरकूल योजनेत सदनिका मिळविण्यासाठी खोटी शपथपत्रे दाखल केल्याच्या आरोपाखाली चिमूरचे आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया (वय ३७ रा. श्रीराम पॅलेस,धंतोली) यांच्याविरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल केले. न्यायालयाच्या आदेशानंतर इमामवाडा व सक्करदरा पोलिसांनी ही कारवाई केली. अॅड. तरूण चतुरभाई परमार (वय ५५ रा. भूपेशनगर, पोलीस लाइन टाकळी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून सदर गुन्हे दाखल करण्यात आले. भांगडिया यांनी मार्च २००७ ते जून २००८ या कालावधीत खोटी शपथपत्रे सादर करून उंटखान्यातील 'नासुप्र'च्या लोक गृहनिर्माण योजनेंतर्गत एबी ३०३ क्रमांकाचा गाळा घेतला.

प्रेयसीची करणार पॉलीग्राफ चाचणी

म. टा. प्रतिनिधी, नागपूरदहेगाव रंगारी येथील महाराजा लॉजमधील रहस्यमय हत्याकांडामागील सत्यता उघडकीस आणण्यासाठी नागपूर ग्रामीण पोलिस अटकेतील तरुणीची पॉलीग्राफ चाचणी करणार आहेत. याबाबत ग्रामीण पोलिसांनी तयारीही सुरू केल्याची माहिती आहे. जियाउद्दीन (वय २७ रा. टेकानाका) असे मृतकाचे, तर मेहजबीन (वय २६ रा. टेका), असे अटकेतील प्रेयसीचे नाव आहे. जियाउद्दीन हा विवाहित असून, १५ दिवसांपूर्वीच त्याला मुलगा झाला. लग्नानंतरही त्याचे मेहजबीनसोबत प्रेमसंबंध होते. दोघांनी कोर्ट मॅरेज केल्याचीही माहिती आहे. गुरुवारी दोघे खापरखेड्यातील दहेगाव रंगारी येथील महाराजा लॉज येथे गेले. त्यांनी खोली भाड्याने घेतली.

Nagpur: व्यापाऱ्याच्या अपहरणाचा थरार; दागिने, रोकड लुटली

म.टा. प्रतिनिधी, नागपूर: बंदुकीच्या धाकावर कापड व्यापारी व त्याच्या मुलाचे अपहरण करून सोन्याचे दागिने व रोख रकमेसह एक लाखाचा ऐवज लुटण्यात आला. ही खळबळजनक घटना शनिवारी उघडकीस आली. या प्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी अपहरणासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून अपहरणकर्त्यांचा शोध सुरू केला आहे.प्रवीण प्रभुदास बजाज (वय ४०, सिंधी कॉलनी, शंकर चौक, गोंदिया) असे या व्यापाऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बजाज यांचे गोंदिया येथे न्यू बजाज स्टोअर्स नावाचे कापडाचे दुकान आहे. कापड खरेदीसाठी २१ जानेवारीला बजाज व त्यांचा मुलगा आर्यन (वय १४) नागपुरात आले. त्यांनी कापड खरेदी केले.