ब्रेकअप केल्याचा राग, पुण्यात प्रियकराने प्रेयसीचे विवस्त्र फोटो स्टेटसवर ठेवले!

म. टा. प्रतिनिधी, पुणे : प्रेमसंबंध तोडल्याने प्रियकराने प्रेयसीचा छळ सुरू केला. या त्रासाला कंटाळून तिने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या रागातून प्रियकराने चक्क प्रेयसीचे विवस्त्र अवस्थेतील छायाचित्र समाज माध्यमावर प्रसारित केले आणि तिची बदनामी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पुणे जिल्ह्यातील शिरूरमधील एका तरुणाच्या विरोधात कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.देवेंद्र धरमचंद फुलफगर (रा. शिरूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत एका ३२ वर्षीय तरुणीने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पंतप्रधान मोदी म्हणतात हा विजय भ्रष्टाचाराविरोधी आक्रोशाचा, तर राज्यपालांनी केला मात्र भलताच दावा

पुणे: गुरुवारी देशातील दोन महत्त्वपूर्ण राज्यांचा निकाल लागला त्यात गुजरातमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपला वाढत असलेलं समर्थन हे घराणेशाही आणि भ्रष्टाचार विरोधातील जनतेच्या आक्रोशाच द्योतक असल्याचं म्हटलं होत. पंतप्रधान नरेंद्र मोदीच नाही तर भाजपचा प्रत्येक नेता हा विजय भ्रष्टाचारविरोधी आक्रोशाचा असल्याचे म्हणत आहेत. मात्र दुसरीकडे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देशातून अजून भ्रष्टाचार संपला नाही, असा दावा केला आहे.

जेवणात मीठ जास्त झालं, पुण्यातील ढाबा मालक भावांनी आचाऱ्याला निर्घृणपणे संपवलं

पुणे (चाकण) : चाकण परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जेवणामध्ये मीठ जास्त झाले म्हणून हॉटेल चालकाने भावाच्या मदतीने आचाऱ्याचा खून केल्याची घटना घडली होती. या घटनेने संपर्ण चाकण शहर हादरले होते. या प्रकरणी आता पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. ढाबा चालक ओंकार केंद्रे (वय २१ वर्ष) व त्याचा लहान भाऊ कैलास केंद्रे (वय १९ वर्ष) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील शेल पिंपळगाव येथे चाकण रोडवर एक धाबा आहे. या ढाब्यावर आचारी म्हणून एक परप्रांतीय कामगार आणला होता.

बृजभूषण सिंहांच्या पुणे दौऱ्यावर कुठलंही भाष्य नको, राज ठाकरेंचे मनसे नेत्यांना आदेश

पुणे : उत्तर प्रदेशातील भाजप खासदार बृजभूषण सिंह पुणे दौऱ्यावर येणार आहेत. या पार्श्वभूमीवर मनसे नेत्यांनी कुठलंही वक्तव्य करु नका, असे आदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. मनसे नेते वसंत मोरे यांनी यासंदर्भात माहिती दिली.यापूर्वी राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध केला होता. मात्र काही काळानंतर त्यांचा विरोध मावळला होता. आता महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या निमित्ताने बृजभूषण सिंह पुण्यात येत आहेत. १५ जानेवारीला त्यांचे आगमन होईल.

पदभरतीबाबत आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा; आरोग्यवर्धिनी केंद्रांत १४०६ समुदाय, आरोग्य अधिकारी भरणार

पुणे : आयुष्यमान भारत योजनेतून राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत आरोग्यवर्धिनी केंद्रात १४०६ समुदाय व आरोग्य अधिकारी यांची पदे रिक्त होती. त्यानुसार या पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. यामुळे प्राथमिक आरोग्य सेवा अधिक सक्षम होईल, असे मत पुणे येथे आरोग्य सेवेचा आढावा घेतांना आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी यांनी व्यक्त केले.केंद्र शासनाने डिसेंबर २०२२ पर्यंत १०३५६ आरोग्य केंद्रे कार्यान्वित करण्याचे लक्ष राज्याला दिले होते.