कोकणात मुसळधार, मुंबई-गोवा महामार्ग ठप्प; चाकरमान्यांची कोंडी

रत्नागिरी: जिल्ह्यात गेल्या जवळपास तीन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असल्यानं जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली असून खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई-गोवा महामार्गावरील काही ठिकाणची वाहतूक थांबविण्यात आली आहे. त्यामुळं गणपतीसाठी कोकणात निघालेल्या चाकरमान्यांचे मोठे हाल झाले आहेत. मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी घाटाच्या पायथ्याला असलेला बावनदीवरील ब्रिटिशकालीन पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. महामार्गावर गाड्यांच्या लांबलचक रांगा लागल्या आहेत.

नितीशकुमार पुन्हा मुख्यमंत्री झाले तर... आव्हाडांची भविष्यवाणी

ठाणे: सुशांतसिंह राजपूत प्रकरण सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयकडे सोपवल्यानंतर आता पुढील प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मात्र, या निर्णयानंतर सुरू झालेली राजकीय टीका-टिप्पणी अद्यापही थांबलेली नाही.

'त्या' सर्वांची तोंडे काळी करून कंगना गेली; सरनाईकांचा विरोधकांना टोला

ठाणे: मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यामुळं शिवसेनेच्या रडारवर आलेली अभिनेत्री कंगना राणावत ही आज मुंबईहून हिमाचल प्रदेशला रवाना झाली. ती गेल्याची संधी साधत शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी अत्यंत शेलक्या शब्दांत विरोधकांवर निशाणा साधला आहे. '.... शेपूट नळीत घातले तरी वाकडे ते वाकडेच' या म्हणीचा अर्थ मला आज तंतोतंत कळला आहे. ज्या लोकांनी शिवसेनेला अडचणीत आणण्यासाठी गेले आठवडाभर कंगनाची बाजू घेतली, त्या सर्वांची तोंडे काळे करून ती आज गेली. आता मारा बोंबा... जय महाराष्ट्र!' असं ट्वीट सरनाईक यांनी केलं आहे.

राज्यातील पालिका निवडणुकांचे 'असे' आहे बिहार कनेक्शन

राजलक्ष्मी पुजारे, कल्याणमागील सात महिन्यांपासून सुरू असलेल्या करोना आणीबाणीमुळे होऊ घातलेल्या निवडणुका रद्द झाल्या असून काही महासभांचा कालावधी संपत आला आहे. मात्र, अद्याप शासनाकडून या निवडणुकांबाबत कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नसून ऑनलाइन प्रणालीचा जास्तीत जास्त वापर करून घेतल्या जाणाऱ्या बिहारच्या निवडणुका कितपत यशस्वी होतात, का याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. बिहार निवडणुका यशस्वी झाल्यास देशातील खोळंबलेल्या इतर सर्व निवडणुकादेखील मार्गी लावण्यासाठीचे प्रयत्न सुरू होतील, असा तज्ज्ञांचा होरा आहे.

'हे म्हणजे माणुसकीची सर्वात खालची पातळी गाठण्यासारखं'

ठाणे: बिहारमध्ये सत्ता मिळाल्यास सर्वांना करोनाची लस मोफत दिली जाईल, अशी घोषणा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला विरोधकांनी घेरले आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपवर तोफ डागली आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करून भाजपच्या आश्वासनाचा पंचनामा केला आहे. (Jitendra Awhad on BJP manifesto for Bihar Election)बिहार निवडणुकीमुळं सध्या देशभरातील वातावरण तापलं आहे. बिहारमधील सत्ता टिकवण्यासाठी भाजप व नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाची आघाडी जोरदार प्रयत्न करत आहे.