...तर आज श्रद्धा जिवंत असती; वडिलांनी सांगितलं पोलिसांचं काय चुकलं; चौकशीची मागणी

मुंबई: श्रद्धाच्या मृत्यूचं आम्हाला दु:ख आहे. आम्ही आमचं दु:ख कधीच विसरू शकणार नाही. आम्हाला न्याय मिळेल असा शब्द दिल्ली पोलिसांनी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. श्रद्धाला अतिशय क्रूरपणे संपवणाऱ्या आफताब पुनावाला कठोर शिक्षा व्हावी. त्याच्या कुटुंबियांची चौकशी व्हावी. ते दोषी आढळल्यास त्यांनाही शासन व्हावं, अशी आशा श्रद्धाचे वडील विकास वालकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे नेते किरीट सोमय्यांची भेट घेतल्यानंतर विकास वालकर यांनी पत्रकार परिषद घेतली. दिल्ली पोलिसांच्या तपासाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं.

'फ्रॅक्चर्ड फ्रीडम' पुस्तकाला मिळालेल्या पुरस्काराची चौकशी होणार, केसरकरांची माहिती

मुंबई : सन २०२१ साठी स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारा अंतर्गत प्रौढ वाङ्मय अनुवादित प्रकारातील तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार कोबाड गांधी लिखित 'फ्रॅक्चर्ड फ्रीडम तुरुंगातील आठवणी व चिंतन' या पुस्तकाला देण्यात आला आहे. या पुस्तकाच्या निवडीसंदर्भात तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षांनी कुठलीही चर्चा केली नाही अथवा ही बाब निदर्शनास आणून दिली नाही. त्यामुळे या सर्वच प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे.साहित्यामध्ये लेखनाचे स्वातंत्र्य असते. परंतु ज्यावर बंदी आहे, ते लिहिता येत नाही.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गातील अडथळा दूर, मुंबई हायकोर्टाने दिला मोठा दिलासा

मुंबईः हाय स्पीड मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामास सुरुवात झाली आहे. दरम्यान, बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या मार्गात अडथळा ठरणाऱ्या तब्बल २१ हजार ९९७ खारफुटीची झाडे तोडण्यास मुंबई हायकोर्टाने परवानगी दिली आहे. मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प सुमारे १.१ लाख कोटी रुपयांचा असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या दिल्या आहेत. प्रकल्पातील सर्व अडथळे दूर करुन प्रकल्प मार्गी लावण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. बुलेट ट्रेन प्रकल्पातील सर्वात मोठा अडथळा होता तो म्हणजे मार्गातील झाडे.

... तर पोलिस भरतीलाच स्थगिती, मुंबई उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला गर्भित इशारा

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : 'तृतीयपंथीयांना सरकारी नोकऱ्यांमध्ये संधी मिळावी यासाठी सर्वोच्च न्यायालयाने २०१४मध्येच सर्व राज्यांना धोरण आखण्याचे निर्देश दिलेले असताना आणि त्याप्रमाणे देशातील ११ राज्यांनी धोरण राबवलेही असताना महाराष्ट्र मागे का? इतकी वर्षे राज्य सरकार झोपेत होते का? तुम्ही (सरकार) तुमचे काम करीत नाही आणि मग नागरिकांनी न्यायासाठी दाद मागितल्यानंतर न्यायालयाने आदेश दिल्यास आमच्या अधिकारांवर अतिक्रमण होत असल्याचा गळा सरकारकडून काढला जातो,' अशा तीव्र शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी राज्य सरकारला फटकारले.

आरे कॉलनीत बिबट्याचे मानवासोबत सहअस्तित्व; कॅमेरा ट्रॅप छायाचित्राला पारितोषिक

मुंबई : आरे कॉलनीत बिबट्याचे अस्तित्व तर आहेच, मात्र ते नुसतेच अस्तित्व नसून ते मानवासोबतचे सहअस्तित्व असल्याचे कॅमेरा ट्रॅप छायाचित्रामुळे स्पष्ट झाले आहे. मुंबईतील एका पोलीस हवालदाराने बिबट्याट्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी आदिवासी कुटुंबाच्या घराबाहेर लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमधील छायाचित्रामुळे हा संदेश पोहोचवला आहे. या वन्यजीव आणि मानवाचे सहअस्तित्व दर्शवणाऱ्या अनोख्या छायाचित्राला 'नेचर इन फोकस'चा पुरस्कार मिळाला आहे.पोलीस हवालदार योगेंद्र साटम यांच्या कॅमेरा ट्रॅप इमेजमध्ये रात्रीच्या वेळी एका आदिवासी कुटुंबाच्या घराबाहेर बिबट्या आला असल्याचे दिसत आहे.