Vikram S : भारताचे पहिले खासगी रॉकेट विक्रम-एस लाँच

श्रीहरीकोटा : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (Indian Space Research Organisation) अर्थात इसरो (ISRO) आज आणखी एक इतिहास रचला आहे. भारताचे पहिले खासगी रॉकेट विक्रम-एस (Vikram S) आज सकाळी ११.३० वा. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून अंतराळात प्रक्षेपित झाले. या सिंगल-स्टेज रॉकेटची निर्मिती भारतीय स्टार्टअप स्कायरूट एअरोस्पेसने केली आहे. ही एक प्रायोगिक मोहीम असून, त्याद्वारे ३ पेलोड्स पृथ्वीपासून सुमारे १०० किमी नेण्यात आले.