ठाणे, नवी मुंबईत वाजणार ‘ितसरी घंटा’

संजय कुळकर्णी
लॉकडाऊन शिथिल झाल्यावर आणि अनलॉक १ सुरू झाल्यावर जरा हायसं वाटलं ते अगदी स्वाभाविक आहे. काही ठिकाणची नाट्यगृह ही सुरू होणार आहेत. त्यामुळे घरात बसलेल्यांना आता नाटकं पहाता येणार आहेत. ठाणे आणि नवी मुंबई येथील गडकरी रंगायतन, डॉ. काशिनाथ घाणेकर आणि विष्णुदास भावे नाट्यगृह रविवार पासून नाट्य प्रयोगांना खुली होणार आहेत. शासनाने प्रसिद्ध केलेल्या नियमांचे पालन करून नाट्य प्रयोग सादर होतील. त्यासाठी त्या त्या नाट्यगृहातील आस्थापनाने तयारी पूर्ण केलेली आहे. आता ती मंडळी वाट पाहताहेत निर्मात्यांच्या नाट्यप्रयोग सादरीकरणाची.

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावर चरित्रपट

मुंबई (प्रतिनिधी) : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १३८ व्या जयंती निमित्ताने निर्माते संदीप सिंह यांनी त्यांच्यावरील चरित्रपटाची (बायोपीक) घोषणा केली. या सिनेमाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर करणार आहेत.
या सिनेमातून सावरकरांबद्दल माहीत नसलेल्या अनेक गोष्टींचा उलगडा होईल, असे संदीप यांनी म्हटले आहे.

गोव्यात शूटिंगला बंदी, अनेक मालिका सापडल्या अडचणीत

पणजी : काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यामुळे शूटिंगला बंदी असल्यामुळे अनेक मालिकांचे शूटिंग इतर राज्यात हलवण्यात आले होते. दरम्यान आता गोव्यात सुरू असलेल्या मराठी मालिकांचे शूटिंग आता अडचणीत सापडले आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मालिका-चित्रपटांच्या शूटिंगला बंदी घातली आहे. सूर नवा ध्यास नवा, रंग माझा वेगळा, तू सौभाग्यवती हो, पाहिले ना मी तुला, अग्गंबाई सूनबाई, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकांचे सध्या गोव्यात शूटिंग सुरू होते.