Joe Root : कसोटी क्रिकेटमध्ये जमवल्या सर्वाधिक धावा

लंडन (वृत्तसंस्था) : इंग्लंडचा माजी कर्णधार जो रुटसाठी यंदाचे वर्ष विशेष ठरले आहे. जो रुटने (Joe Root) २०२२ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत.
वर्ष २०२२ मध्ये इंग्लंडचा माजी कर्णधार फलंदाज जो रुट कसोटी क्रिकेटमध्ये एका वेगळ्याच लयीत दिसला आहे. यावर्षी त्याच्या बॅटमधून एकूण ५ शतके आणि दोन अर्धशतके झळकली आहेत. यामध्ये १७६ धावा ही त्याची सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. रुटने २०२२ मध्ये १३ सामन्यांच्या २४ डावांमध्ये ५०.९० च्या सरासरीने १०६९ धावा केल्या आहेत.

FIFA World Cup : स्पेनचे प्रशिक्षक एनरिक यांची हकालपट्टी

मॅड्रीड (वृत्तसंस्था) : फिफा विश्वचषक स्पर्धेच्या (FIFA World Cup) बाद फेरीतून संघाला गाशा गुंडाळावा लागल्याने स्पेनच्या चांगलेच जिव्हारी लागले आहे. या पराभवानंतर स्पेनचे प्रशिक्षक एनरिक यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.
स्पेनने त्यांच्या पहिल्या सामन्यात मोठा विजय मिळवून फिफा स्पर्धेची दमदार सुरुवात केली होती. परंतु त्यांनी शेवटचा गट सामना गमावला. सुपर १६ च्या फेरीत मोरोक्कोकडून पेनल्टीवर पराभूत होत स्पेनचे आव्हान संपुष्टात आले.

IND vs BAN : जखमी रोहित भिडला… पण विजय निसटला

मीरपूर (वृत्तसंस्था) : मेहेदी हसन मिर्झाच्या धडाकेबाज अर्धशतकामुळे बांगलादेशने बुधवारी दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात (IND vs BAN) भारतावर रोमहर्षक विजय मिळवत मालिकाही खिशात घातली. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात जखमी झालेला भारतीय कर्णधार रोहित शर्माने आठव्या जागेवर फलंदाजीला येत यजमानांना घाम फोडला होता. मुस्तफिझुरने शेवटचा निर्णायक चेंडू अप्रतिम फेकत भारताच्या मालिका वाचविण्याच्या स्वप्नांना धुळीस मिळवले.

World Weightlifting Championships : मीराबाई चानूची रौप्य पदकाला गवसणी

बोगोटा (वृत्तसंस्था) : भारताची स्टार खेळाडू मीराबाई चानूने कोलंबियामध्ये सुरू असलेल्या जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये (World Weightlifting Championships) रौप्य पदक जिंकण्याची कामगिरी केली.
चानूने ४९ किलो वजनी गटात २०० किलो वजन उचलून दुसरे स्थान पटकावले. तिला स्नॅचमध्ये केवळ ८७ किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये ११३ किलो वजन उचलता आले. चीनच्या जियांग हुइहुआने २०६ किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकले.

ICC Player of the Month : ‘प्लेयर ऑफ द मंथ’साठी बटलर, रशीद, आफ्रिदीला नामांकन

लंडन (वृत्तसंस्था) : नोव्हेंबर महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या तीन खेळाडूंना आयसीसीच्या सर्वोत्तम खेळाडूचे नामांकन (ICC Player of the Month) मिळाले आहे.
इंग्लंडचा जोस बटलर, आदिल रशीद आणि पाकिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी यांना त्यात स्थान दिले आहे. या तिघांपैकी एका खेळाडूला आयसीसी प्लेयर ऑफ द मंथचा पुरस्कार दिला जाणार आहे. महिन्याभरात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या एका खेळाडूला आयसीसीतर्फे गौरविण्यात येते. त्यानुसार आयसीसीने नोव्हेंबर महिन्यातील दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचे नामांकन दिले आहे.