नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृ्त्त्वात २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं ३०३ जागा मिळवत एकहाती सत्ता मिळवली. मात्र, राष्ट्रीय लोकशाही आघाडीद्वारे लोकसभा निवडणूक लढवल्यानं मित्रपक्षांना नरेंद्र मोदींनी मंत्रिपदं दिली. मात्र, १८ खासदार असणारा एनडीएचा सर्वात मोठा मित्र पक्ष असलेली शिवसेना महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या प्रयोगानिमित्त बाहेर पडली. शिवसेनेनंतर केंद्रीय कृषी कायद्यांच्या मुद्यावर पंजाबमधील अकाली दलानं देखील एनडीएची साथ सोडली.शिवसेना एनडीएबाहेर पडल्यामुळं बिहारमधील जदयू हा भाजपचा बिहारमधील सर्वात मोठा मित्र पक्ष होता.