आधीच आर्थिक चणचण, त्यात चाचणीच्या खर्चाची भर; घरेलू कामगार अडचणीत

पुणे : शहरात असंख्य हाउसिंग सोसायटीमध्ये लाखो नागरिक राहत असून, त्यातील बहुतांश नोकरी करत आहेत. तर घरकाम आणि सोसायटीच्या देखभालीसाठी विविध कामगारांची गरज असते. कोरोनाचे वाढते संकट पाहता, कामगारांसाठी कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली. मात्र, चाचणीचा खर्च, चाचणीबाबत संभ्रम व त्यामुळे निर्माण होणाऱ्या असुविधांची व्यथा कामगारांकडून सांगण्यात येत आहे.

Ramadan 2021: रमजान महिन्याला प्रारंभ, आज पहिला रोजा

औरंगाबाद: रमजानच्या चंद्राचे मंगळवारी (ता.१३) संध्याकाळी दर्शन झाल्याने बुधवारी (ता.१४) पहिला रोजा राहणार आहे. ब्रेक दी चेनअंतर्गत कडक निर्बंध लागू असल्याने अनेकांनी प्रत्यक्ष न भेटता फोन, सोशल मिडियावरुन रमजान आणि चांद मुबारकच्या शुभेच्छा दिल्या.

डॉक्टरांनी रुग्णाला केले मृत घोषित, नातेवाईकांना माहिती होताच डॉक्टरांना केली मारहाण

हिंगणघाट(जि. वर्धा) : शहरातील एका कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाल्याने संतप्त झालेल्या कुटुंबीयांनी एका खासगी सेवा देणाऱ्या डॉक्टरांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. यामुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यासंदर्भात सदर डॉक्टरांनी पोलिसांत तक्रार दिली असून संबंधितांवर कारवाई न झाल्यास १४ एप्रिलपासून आयएमएच्यावतीने बंद पुकारण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

पाटण तालुक्‍यात पाच गव्यांचा कळप विहिरीत कोसळला; धावडेत मुक्‍या प्राण्यांचे जीवन धोक्यात

मोरगिरी (जि. सातारा) : डोंगरांना मोठ्या प्रमाणात लावले जाणारे वणवे, त्यात भस्म होणारी वनसंपदा, जंगलातील पाणवठ्यांची घटणारी संख्या यामुळे रानगवे नागरी वस्तीकडे "कुच' करत आहेत. पाटण तालुक्‍यातील धावडे गावाजवळ पाण्याच्या शोधार्थ आलेला पाच गव्यांचा कळप विहिरीत कोसळला. त्यातील चार गव्यांना वन विभागाने शर्थीचे प्रयत्न करून वाचवले. त्यामुळे वन्यजीवांच्या अधिवासात होणारे नागरिकांचे अतिक्रमण आणि त्यांना होणारा त्रास थांबवण्याचीच गरज यातून अधोरेखित होत आहे. 

रेमडिसिव्हिर इंजेक्शनचे दहा हजार साठा आला, तुटवडा जाणवणार नाही

जालना :  राज्यातील अनेक जिल्ह्यांत सध्या रेमडिसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा आहे. जालन्यात ही मागणी प्रमाणे रेमडिसिव्हिर इंजेक्शनाचा पुरवठा होत नव्हता. मात्र, बुधवारी (ता.१४) सकाळी जिल्ह्यात दहा हजार रेमडिसिव्हिर इंजेक्शनाचा साठा उपलब्ध झाला असून हा साठा जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणाखाली करवा एजन्सीकडे देण्यात आल्याची माहिती औषध प्रशासनाच्या सहायक आयुक्त अंजली मिटरक यांनी दिली आहे.