योगा लाइफस्टाइल - कणा ताठ करणारी योगासने

वाचकांनो, जरा ताठ मानेने उभे राहा. होय. तुम्हाला कायमच कोणाला तरी खूष करण्यासाठी मान झुकवावी लागते. असे कायमच मान तुकवणे तुमच्या आत्मसन्मानासाठी किती योग्य आहे...
भुजंगासन
कोब्रा स्वतःला वाचवण्यासाठी त्याचा फणा वर काढतो. तुम्हीही स्वतःला सामर्थ्यवान बनविण्यासाठी असे ताठ उभे राहिले पाहिजे. त्यासाठी तुमचे पोट सपाट करा, स्नानू बलवान करा आणि पाठीचा कणा ताकदवान बनवा. तुमच्या सर्व अवयवांना संपूर्ण समाधान लाभेल आणि सर्व प्रकारच्या थकव्यापासून तुमची मुक्तता होईल. जा, झेप घ्या, मान आणखी वर घ्या आणि आयुष्य तुम्हाला जमिनीवर लोळवू पाहील तेव्हा अधिक त्वेषाने उभे राहा...

वजन घटवण्यासाठी फायदेशीर आहे पपई! जाणून घ्या

नाशिक : पपई एक उष्ण फळ आहे भारतीय बाजारांमध्ये पपई सहजतेने आढळतात. हे फळ खाण्यास अतिशय गोड आणि चविष्ट अते. पिवळा सुंदर रंग आणि गोड स्वादामुळे हे फळ अनेक डिशमध्ये आपली छाप पाडते. पपईमध्ये व्हिटामिन ए,सी बी, कॅल्शियम, आर्यन आणि फॉस्फरससारख्या खनिजांचा समावेश आहे. पपईमुळे केस, त्वचा आणि आरोग्य चांगले राहते.
वजन घटवण्यासाठी फायदेशीर आहे पपई

कोरोना काळ अन् उन्हाळ्यात रोगप्रतिकारशक्ती चांगली ठेवायचीय? 'या' टीप्स वाचा अन् राहा निरोगी

नागपूर : उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आरोग्यासंबंधी अनेक आव्हानं येतात. पण आपली रोगप्रिताकार शक्ती चांगली असेल तर या वातावरणाचा आपल्यावर फरक पडत नाही. त्यामुळे अनेक पोषक तत्व असलेला आहार घ्यायला विसरू नका. त्यामुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती चांगली राहण्यास मदत होईल. त्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही टीप्स सांगणार आहोत.
व्यायाम करणे गरजेचे -
दररोज व्यायाम करणे गरजेचे आहे. त्यामुळे ब्लड सर्क्युलेशन चांगले होते. तसेच फुफ्फुस आणि वायूमार्गातून बॅक्टेरियाची सुटका होते. तसेच तणावसंबंधी हार्मोन देखील कमी सिक्रेट होतात. 

कोरोना काळात सेक्स लाईफ कसं असायला हवं?

नवी दिल्ली- कोरोना काळ हा सर्वांसाठीच आव्हानाचा ठरला आहे. २०२० च्या सुरुवातीला सुरु झालेल्या या महामारीने सर्व जगाला एकप्रकारे वेढीस धरलं आहे. अनेक देशांमध्ये कोरोनाची दुसरी किंवा तिसरी लाट आलीये. त्यामुळे कोरोनाचा धोका टळलेला नाही आणि पुढील काही काळ तो टळण्याची शक्यता नाही. अशावेळी कोरोना संसर्गपासून वाचण्यासाठी वैयक्तीक पातळीवर काळजी घेणे महत्त्वाचे आहे. त्यात मास्क लावणे, वारंवार हाथ धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे अशा गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कोरोना महामारीने लोकांच्या जीवनमानावरही प्रभाव टाकला आहे. विशेषत: आपल्या सेक्स लाईफवर कोरोना महामारीने अनेक निर्बंध आणले आहेत.

फायदेशीर असूनही होमिओपॅथी उपचारपद्धती दुर्लक्षित का? वाचा महाराष्ट्रात कशी पोहोचली होमिओपॅथी

नागपूर : कुठलाही आजार झाला, तर सर्वसामान्यपणे अॅलोपॅथी औषधांकडे आपला कल असतो. पण, याच काळात एका फायदेशीर उपचारपद्धतीकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. ही उपचार पद्धती म्हणजे होमिओपॅथी. यामुळे आजार हळूहळू बरा होत जातो. परंतु, रुग्ण पूर्णपणे बरा होतो. मात्र, सार्वजनिक आरोग्य सेवेत होमिओपॅथी डॉक्टरांचा समावेश नाही. तसेच रिसर्च सेंटर उपलब्ध नसल्याने होमिओपॅथीकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत ऑरेंज सिटी होमिओपॅथ असोसिएशनचे अध्यक्ष आणि आयुष टास्क फोर्स ऑन कोविड (महाराष्ट्र) चे सदस्य डॉ. मनीष पाटील यांनी व्यक्त केली.