ex mla vivek patil arrested कर्नाळा बँक घोटाळा: माजी आमदार विवेक पाटील यांना ईडीकडून अटक

पनवेलः कर्नाळा बँकेचे अध्यक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते, माजी आमदार विवेक पाटील यांना कर्नाळा बँक घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली आहे. बँकेच्या ५२९ कोटींच्या घोटाळ्यातील विवेक पाटील हे प्रमुख आरोपी आहेत. मुंबई ईडी झोन-२चे सहाय्यक संचालक सुनील कुमार यांनी पाटील यांना त्यांच्या पनवेलमधील घरातून ताब्यात घेतले आहे. राज्य शासनाचे गृहखाते अटकेची कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याने तीन महिन्यांपूर्वी पनवेल संघर्ष समितीने ईडीचे मुख्य विशेष संचालक सुशील कुमार यांच्याकडे लेखी कैफियत मांडली होती. त्यानुसार अखेर आज पाटील यांना अटक करण्या आली.

नागपुरात करोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट; म्युकरमायकोसिसचे रुग्णही झाले कमी!

नागपूर : करोना विषाणू प्रादुर्भावात होरपळलेलं नागपूर आता सुटकेचा नि:श्वास सोडत आहे. कोविडच्या दोन लाटांची झळ सोसल्यानंतर संसर्ग साखळी तोडण्यात यश आल्याने पॉझिटिव्हिटी दरही मंगळवारी अर्ध्या टक्क्यापर्यंत खाली घसरला आहे. जिल्ह्याला दिलासा देणारी बाब म्हणजे नव्याने करोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या आज अर्धशतकाखाली ४६ वर स्थिरावली आहे, तर ३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.करोनाचा विळखा पडल्याच्या संशयातून मंगळवारी जिल्ह्यातून तपासलेल्या ७८१८नमुन्यांमध्ये ७७७२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

warning to naxalites मराठा आरक्षण: गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा नक्षलवाद्यांना 'हा' इशारा

म. टा. प्रतिनिधी, पुणेनक्षलवाद्यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी पत्रक काढून मराठा समाजातील तरुणांना क्रांतीकडे वळण्याचा सल्ला देणे, हे व्यवस्थेला आव्हान देणारे असल्याचे सांगत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी नक्षलवाद्यांना कारवाईचा इशारा दिला आहे. (Home Minister Dilip Walse Patil has warned the Naxals to take action)वसंतदादा शूगर इन्स्टिट्यूटच्या नियामक मंडळाची बैठक माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत झाली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना वळसे-पाटील यांनी हे वक्तव्य केले.

...म्हणून पेट्रोल घेऊन युवक थेट पोहोचला ग्रामपंचायत कार्यालयात

अमरावती : एका युवकाने थेट पेट्रोलची बाटली घेऊन ग्रामपंचायतीत दाखल होत आत्मदहनाचा इशारा दिल्याची घटना अमरावती जिल्ह्यात घडली आहे. ग्रामपंचायतीला मागितलेल्या लेखी उत्तराला वारंवार केराची टोपली दाखवल्यामुळे युवकाने हे पाऊल उचलल्याची माहिती आहे. निलेश रघुवंशी असं सदर युवकाचं नाव आहे.नांदगांव पेठ येथील एका खुल्या जागेवर क्रीडा मंडळाचे खेळाडू कबड्डी खेळत असल्याने ग्रामपंचायतीने त्यांना जागा खाली करण्यासाठी नोटीस देऊन पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

यापुढे डॉक्टरांवर हल्ले करणाऱ्यांवर उपचार नाही; आयएमएचा इशारा

नागपूर: करोना महामारीच्या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता डॉक्टर रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी प्रयत्न करीत असताना काही समाजकंटक डॉक्टरांवरच हल्ला करीत असल्याने डॉक्टरांचे मनोधैर्य खचत आहेत. मात्र भविष्यात अशा घटना घडल्यास संबंधित हल्लेखोर आणि त्यांच्या नातेवाईकांवर सरकारी किंवा खासगी रुग्णालयात डॉक्टर उपचार करणार नाहीत, असा इशारा इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) नागपूर शाखेचे अध्यक्ष डॉ. संजय देवतळे यांनी आज पत्रपरिषदेत दिला. डॉक्टर व रुग्णालये यांच्यावरील हल्ल्यांच्या निषेधार्थ येत्या १८ जून रोजी देशभर निषेध दिन पाळण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.