चिंता वाढली: दुसऱ्या स्ट्रेनचा शिरकाव; मृत्यू वाढले 

रत्नागिरी :  जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या स्ट्रेनचा शिरकाव झाला आहे. पहिल्या विषाणूपेक्षा या विषाणूमध्ये जास्त दाहकता, अधिक संसर्ग पसरविण्याची क्षमता आहे. एका बाधितामुळे १० ते २० जणांना बाधा पोचू शकते. हे रोखण्यासाठी शिमगोत्सवानंतर जिल्ह्यात नव्या आदेशानुसार सर्व खासगी कंपन्या, आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. सर्व लोकांची तपासणी होऊन ते फिल्टर होतील. त्यानंतर बाधितांची संख्या कमी येईल, असा विश्‍वास जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केला. 

No Mask No Entry: रत्नागिरीत 229 जणांवर कारवाई

रत्नागिरी :  कोरोना काळात लागू करण्यात आलेल्या शासकीय निर्बंधांचे उल्लंघन करणार्‍या 229 जणांवर पोलिसांनी कारवाई केली. त्यांच्याकडून 1 लाख 66 हजार रुपयाचा दंड वसूल करण्यात आला. यामध्ये शासनाने दुकाने उघडण्यावर बंदी घालत दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी लागू केली होती. तरीही अत्यावश्यक काम नसताना विनाकारण फिरणार्‍या, मास्क न वापरणार्‍यांचा यामध्ये समावेश आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागातील पोलिस ठाण्यांनी ही कारवाई केली.

रत्नागिरीत व्यापाऱ्यावर दांडक्याने केला हल्ला; संशयित फरार

रत्नागिरी : शहरातील चर्च रोड येथे दोघा व्यापाऱ्यांवर अज्ञातांनी खुनी हल्ला झाला. त्यांना  लुटण्याचा प्रयत्न फसल्यानंतर तेथून पलायन केले. काल रात्री ९ वाजता चर्च रोड येथे ही घटना घडली .
रमीझ हजीहबीब आकवानी (वय 32. रा. माजगाव ) किराणा माल व्यापारी व भाऊ वसीम या दोघांवर प्राणघातक हल्ला करून लुटण्याचा प्रयत्न झाला. हे दोघेही काल रात्र 9 च्या सुमारास जुने भाजी मार्केट येथील आपले किरणामालाचे दुकान बंद करून आपल्या माजगाव रोड येथील घरी दुचाकीवरून जात असताना ही घटना घडली.

वैभववाडीत दौऱ्यानंतर अधिकाऱ्याच्या पोटात लागले दुखू; टेस्ट पॉझिटिव्ह अन् क्षणातच मृत्यू

वैभववाडी (सिंधुदुर्ग) : तालुक्‍यातील एका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे काल मृत्यू झाला. कणकवलीतील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. एका मंत्र्यांच्या  दौऱ्यात ते सहभागी होते. त्यामुळे दौऱ्यातील लोकप्रतिनिधी, राजकीय पदाधिकारी व अधिकाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

लॉकडाऊन रत्नागिरी ॲक्‍शन प्लॅन; लढा देण्याचा सर्वपक्षीय संकल्प: उदय सामंत

रत्नागिरी : कोरोनाचे वाढते प्रमाण आणि लॉकडाउनबाबत सर्वपक्षीय बैठकीत ॲक्‍शन प्लॅन तयार करण्याचा निर्णय झाला. यात टास्क फोर्सशी चर्चा करून त्यांनी केलेल्या सूचनेवर कार्यवाही सुरू आहे. कोणतेही राजकारण न आणता कोविडला घालवायचे असेल तर मिळून लढा देण्याचा सर्वपक्षीय संकल्प केला. व्यापारी वर्ग आधीच अडचणीत आहे. त्यांच्यावर कोणताही कायदेशीर बडगा उगारू नये, अशा सूचना प्रशासनाला िदल्या आहेत, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.