बलवडीत छावणी मुक्तसाठी चारा प्रकल्प प्रगतीपथावर 

आळसंद : बलवडी ( भा.) ता.खानापूर्‌ येथे उगम फांऊडेशन तर्फे लोकसहभागातून छावणी मुक्त महाराष्ट्र प्रकल्प अंतर्गत सुमारे दहा एकर क्षेत्रातील मका पिक चांगले बहरले आहे. दुष्काळी स्थितीत कायमस्वरुपी चाऱ्याचा साठा तयार करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहीत करायचे. त्यावर आधारित असा स्वयंनियंत्रित असा चारा उद्योग उभा करता येईल, यासाठीचा पथदर्शी प्रकल्प बलवडीच्या मातीत साकारत आहे. 

''कोरोना रुग्ण नाहीत का? ‘रेमडेसिव्हिर’परत का पाठवली''! 

सांगली : कोरोना रुग्णांची जिल्ह्यातील संख्या वाढत आहे. अत्यवस्थ रुग्णांना रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनची गरज भासते आहे. आता इंजेक्‍शनचा तुटवडा निर्माण होत आहे. अशा गंभीर परिस्थितीत जिल्ह्यातून दीड हजार इंजेक्‍शन १५ दिवसांपूर्वी पुणे विभागाकडे परत पाठवण्यात आली आहेत. हे प्रकरण अतिशय गंभीर असून त्याची पूर्ण चौकशी करावी, अशी मागणी आमदार सदाभाऊ खोत यांनी आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे. 

पंधरवड्याची भिती: सांगलीत बाजारपेठेत तोबा गर्दी 

सांगली  : कोरोनाला रोखण्यासाठी "ब्रेक द चेन' मोहिमेंतर्गत राज्यात आज रात्री आठ वाजल्यापासून पुढील पंधरा दिवस संचारबंदी लागू होत आहे. शासनाने बाहेर फिरण्यावर कडक बंधने घालण्याचा इशारा दिल्याने आज सकाळपासूनच बाजारात गर्दी दिसत होती. पुढचा पंधरवडा घरबंद राहण्याची वेळ येणार असल्याने जीवनावश्‍यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी नागरिकांची लगबग सुरु होती. 

जिल्ह्यातील एवढ्या लाख रेशनकार्डधारकांना मोफत धान्य : संचारबंदी काळात सरकारची मदत.. 21 ठिकाणी मोफत शिवभोजन थाळी 

सांगली- राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढ रोखण्यासाठी राज्य सरकारने आजरात्री ( ता. 15) आठ वाजल्यापासून पंधरा दिवस संचारबंदी लागू केली आहे. या संचारबंदीचा गरीब व कष्टकरी वर्गाला फटका बसू नये यासाठी 5 हजार 476 कोटीचे पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये अन्न सुरक्षा योजनेतील राज्यातील सात लाख लाभार्थींना एक महिना 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ मोफत देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 3 लाख 94 हजार 227 कार्डधारकांना त्याचा लाभ मिळणार आहे. 

सांगलीत काय सुरु, काय बंद? संचारबंदीची होणार कडक अंमलबजावणी

सांगली : जिल्ह्यातील करोना संसर्गाची साखळी तोडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आज रात्रीपासून 1 मे 2021 पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. विनाकारण फिरल्यास एक हजार रुपयांच्या दंडासह गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिला आहे. अत्यावश्‍यक सेवा सुरुच राहणार आहेत. दवाखाने, मेडिकल, बॅंका, शासकीय कार्यालये, भाजीपाला विक्री सुरु राहील. संचारबंदीच्या अंमलबजावणीसाठी तीन हजार पोलिसांना खडा पहारा ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.