यवतमाळ : गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना भारतात दाखल झाला. कोवीड-१९ या विषाणूने वर्ष लोटूनही आपला पिच्छा सोडला नाही. कोरोनाचे ‘गूढ’ अद्याप कायम आहे. कडक संचारबंदी, जनता कर्फ्यू पाळला, तरीही राज्यात कोरोनाची दुसरी लाट जोरात आली आहे. त्यात अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. तरीही, सोशल मीडियावर ‘कोरोना नाहीच, मला कोरोना होणार नाही,’ अशा आशयाचे संदेश फिरताना दिसत आहे. कोरोना नाही म्हणणे किंवा मला कोरोना होणार नाही, असे म्हणणे हा भ्रमच मुळी चुकीचा आहे. कोरोना काय आहे हे ज्याला कोवीड-१९ होतो तोच सांगू शकतो.