महिलेचा हात पकडत अतिप्रसंग, विरोध करताच पेटवण्याचा प्रयत्न; जळगावात खळबळ

Primary tabs

जळगाव : अतिप्रसंगाला विरोध करणाऱ्या विवाहितेला पेटवून अज्ञात व्यक्तीने जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना भडगाव शहरात काल घडली. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली असून महिलांच्या सुरक्षेतेचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी भडगाव पोलीस स्टेशनमध्ये एका ५० वर्षीय व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी तीन वाजेच्या सुमारास भडगांव शहरातील ओम शांती केंद्राच्या मागे एक ५० वर्षीय अनोळखी पुरुषाने ४७ वर्षीय पिडीत विवाहितेचा हात पकडून अश्लील संवाद करत अश्लील कृत्य केले. तसेच यानंतर त्याने पिडीतेवर अतिप्रसंग केला. पिडीत महिलेने विरोध करताच पेटवून देत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी अंगात तपकिरी रंगाचा शर्ट, हिरवट पॅट, पायात बूट, बारीक दाढी अशा वर्णाच्या ५० वर्षीय अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर करत आहेत.

दरम्यान, पिडीत महिलेवर जळगाव शहरातील रुग्णालयात उपचार सुरु असून तिची प्रकृती ठीक असल्याची माहिती मिळाली आहे.