Jitendra Awhad: रामदेव बाबांच्या मनात आणि नजरेत विकृती भरलीय; जितेंद्र आव्हाड संतापले

Primary tabs

ठाणे: योगगुरू यांनी ठाण्यातील एका कार्यक्रमात महिलांच्या पेहरावाच्या मुद्द्यावरुन केलेल्या वक्तव्यावरुन सध्या वादंग निर्माण झाला आहे. साडीमध्ये महिला चांगल्या दिसतात, सलवार सूटमध्ये चांगल्या दिसतात, माझ्या नजरेने पाहिलं, तर काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात, असे रामदेव बाबा यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार यांनी रामदेव बाबा यांना फटकारले आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केले आहे. त्यामध्ये आव्हाड यांनी म्हटले आहे की, रामदेव बाबांना आई आहे … आणि ते ब्रम्हचारी. .. मग … मनात डोळ्यात विकृती … मराठी साहित्यात परस्त्री माते समान…, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

रामदेव बाबा नेमकं काय म्हणाले?
रामदेव बाबा ठाण्यातील योगा कार्यक्रमामध्ये बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यावेळी उपस्थित होते. महिलांनी योगासाठी ड्रेस आणले होते आणि त्यानंतर महिलांसाठी महासंमेलानाचे आयोजन करण्यात आले होते. या महासंमेलानासाठी महिलांनी साड्या आणल्या होत्या. मात्र सकाळी योग विज्ञान शिबिर झाले, त्यानंतर महिलांना योग प्रशिक्षण उपक्रम पार पडला. त्यांनंतर लगेच महिलांसाठी महासंमेलन सुरू करण्यात आले. त्यामुळे महिलांना साड्या नेसायला वेळच मिळाला नाही. यावर बाबा रामदेव यांनी एक विधान करत म्हटले की, साड्या नेसायला वेळ नाही मिळाला, तरी काही समस्या नाही, आता घरी जाऊन साड्या नेसा, पुढे बोलताना रामदेव म्हणाले की, महिला साड्या नेसून पण चांगल्या वाटता, महिला सलवार सूटमध्ये सुद्धा चांगल्या वाटतात, आणि माझ्या नजरेने काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात असे रामदेव बाबा म्हणाले.

रुपाली ठोंबरेंची रामदेव बाबांवर टीका
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी रामदेव बाबा यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. रामदेव बाबांना अक्कल नावाचा प्रकार नाही. महिलांनी काय घालायाचं काय नाही हा तिच्या स्वातंत्र्याचा प्रश्न आहे. हे विधान अमृता फडणवीस यांच्या समोर झालं आहे. अमृता फडणवीस यांनी तेव्हाच त्यांच्या सणकन कानाखाली ओढायला हवी होती, असे रुपाली ठोंबरे पाटील यांनी म्हटले. भाजपशी संबंधित लोक महिलांचा वारंवार अपमान करतात. गृहखात्याने बाबा रामदेव यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही रुपाली ठोंबरे पाटील यांनी केली.