भाच्याची गाडी रोखली म्हणून... महिला आमदारानं पोलिसाच्या कानशिलात लगावली!

Primary tabs

बांसवाडा, राजस्थान : राजस्थानच्या एका महिला आमदाराच्या दादागिरीनं पोलीस विभागात नाराजीचं आणि संतापाचं वातावरण दिसून येतंय. या महिला आमदारानं एका हेड कॉन्स्टेबलच्या कानाखाली मारल्याचा आरोप करण्यात येतोय. महिला आमदाराची दादागिरी पोलिसांनी आपल्या भाच्याची गाडी अडवण्यावरून महिला आमदार नाराज झाल्या होत्या. यामुळे, गाडी थांबवून नियमाप्रमाणे दंड वसूल करणाऱ्या पोलीस शिपायावर रागावलेल्या महिला आमदारानं चक्क हात उगारला. या प्रकरणात महिला आमदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बांसवाडा जिल्ह्याच्या कुशलगढ इथं ही घटना घडलीय. या अपक्ष महिला आमदाराचं नाव रमिला खरिया असं आहे. हेड कॉन्स्टेबल महेंद्र नाथ सिंह यांनी महिला आमदाराच्या दादागिरीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सोबतच, हेड कॉन्स्टेबल महेंद्र नाथ यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आलाय. 83535086 83534043 आमदाराच्या भाच्याची गाडी रोखलीहेड कॉन्स्टेबल महेंद्र नाथ यांच्या म्हणण्यानुसार, बाईकवरून जाणाऱ्या सुनील बारिया यांना नाकेबंदी दरम्यान पोलिसांकडून रोखण्यात आलं होतं. करोना संसर्ग काळात आदेशाप्रमाणे ठिकठिकाणी नाकाबंदी सुरू आहे. तसंच येणाऱ्या-जाणाऱ्यांचीही चौकशी केली जातेय. परंतु, रमिला खरिया या महिला आमदाराचा भाचा असलेल्या सुनील बारिया याला पोलिसांनी रोखणं अजिबात रुचलं नाही. बारिया यानं पोलिसांची कॉलर पकडून त्यांना नोकरीवरून काढून टाकण्याची धमकीही दिली. पोलिसांनी सुनील बारिया याच्यावर नियमाप्रमाणे दंडात्मक कारवाई केली. याची तक्रार सुनील बारिया यानं रमिला खारिया यांच्याकडे केल्यानंतर महिला आमदारानं दंडात्मक कारवाई करणाऱ्या हेड कॉन्स्टेबल महेंद्र नाथ यांच्या कानशिलात लगावली. पोलिसांच्या आंदोलनानंतर गुन्हा दाखलमहेंद्र नाथ यांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध दाद मागत महिला आमदाराविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली तेव्हा स्टेशन प्रभारी प्रदीप कुमार यांनी आपल्याला आमदाराची माफी मागण्याचे आदेश दिल्याचंही महेंद्र नाथ यांनी म्हटलंय. हे आदेश मानण्यास महेंद्र यांनी नकार दिला. हेड कॉन्स्टेबल महेंद्र नाथ यांच्या समर्थनार्थ इतर पोलीस कर्मचाऱ्यांनीही आंदोलन करत खाण्या-पिण्यास नकार दिला. त्यामुळे दबावाखाली येऊन पोलिसानी आमदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला. सोबतच हेड कॉन्स्टेबल महेंद्र नाथ यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण चौकशीसाठी सीबीसीआयडी कडे सोपवण्यात आलंय. 83532379 83532117मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट