पक्षनेतृत्वाची भेट न घेताच सचिन पायलट दिल्लीतून उत्तराखंडात

Primary tabs

हरिद्वार : राजस्थानात अशोक गेहलोत सरकारविषयी आपल्या मनातील असंतोष पक्ष नेतृत्वापर्यंत पोहचवण्यासाठी दिल्लीत दाखल झालेले काँग्रेसचे नेते आज अचानक उत्तराखंडात दाखल झाले. गेले चार दिवस दिल्लीत मुक्काम ठोकूनही राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांची पक्ष नेतृत्वाशी भेट होऊ शकली नाही, हे विशेष. काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सचिन पायलट आज दिल्लीहून जयपूरला दाखल होतील अशी शक्यता वर्तवण्यात येत असतानाच ते अचानक उत्तराखंडातील मंगलौरमध्ये दाखल झालेले दिसले. मंगळवारी दुपारी सचिन पायलट यांनी मंगलौरमध्ये पक्षाचे आमदार काझी निजामुद्दीन यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. काझी निजामुद्दीन यांच्या आईचं काही दिवसांपूर्वी निधन झालं होतं. आपल्या भेटीदरम्यान सचिन पायलट यांनी निजामुद्दीन यांना सांत्वना दिली. या दोन्ही नेत्यांनी जवळपास अर्धा तास बंद दाराआड चर्चा केली. 83456913 83366997अगोदर ज्योतिरादित्य आणि आता जितीन... राहुल गांधींचे 'हिरे' निखळले! पत्रकारांनी यासंदर्भात सचिन पायलट यांना प्रश्न विचारला तेव्हा आपण इथे केवळ काझी निजामुद्दीन यांची भेट घेण्यासाठी आलो होतो. काझी यांच्याशी आपले कौटुंबिक जिव्हाळ्याचं नातं असल्याचं सचिन पायलट यांनी म्हटलंय.

पत्रकारांशी बोलताना सचिन पायलट यांनी राज्यातील सत्ताधारी भाजपवर टीका केली. 'मुख्यमंत्री बदलल्यानं भाजपची पापं धुतली जाणार नाहीत. इथे काँग्रेस एकजूट आहे. आगामी निवडणुकीत आम्ही इथे सत्ता स्थापन करू' असं सचिन पायलट यांनी म्हटलं. 83541968 83537121 मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट