Junior College Admission: कनिष्ठ महाविद्यालयांना रिक्त जागांचा फटका, शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भीती

Primary tabs

औरंगाबाद : पुणे-मुंबईच्या धर्तीवर मागील तीन वर्षापासून औरंगाबाद महापालिका हद्दीतील महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे. या ऑनलाईन पद्धतीचा फटका शहरातील अनेक कनिष्ठ महाविद्यालयांना बसला आहे. यामुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहात असल्याचे दिसून आले आहे. त्याचा परिणाम कला, वाणिज्य शाखेच्या तुकड्यांवरही होत असून शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भीती बळावली आहे. 
कोविन ॲपला पुन्हा संसर्ग, हातोहात निरोप देण्याची औरंगाबाद महापालिकेवर नामुष्की  
यंदा अकरावी प्रवेशासाठी शहरात एकूण ११६ महाविद्यालये असून त्यांची प्रवेश क्षमता ३१ हजार ४६५ आहे. त्यापैकी अर्जाचा भाग एक १९ हजार ५४३ विद्यार्थ्यांनी भरला असून, पडताळणी १९३५९ विद्यार्थ्यांनी केली आहे. अर्जाचा भाग दोन हा १६ हजार ४०४ विद्यार्थ्यांनी भरला. पहिल्या फेरीसाठी ८ हजार ७४० विद्यार्थ्यांपैकी ६५६७, दुसऱ्या फेरीत ५०४४ पैकी३०३६, तीसऱ्या फेरीत १८७२ पैकी, ८१८ तर स्पेशल फेरीत ३२९३ पैकी २९०७ विद्यार्थ्यांना अलॉटमेंट देण्यात आली होती. याफेऱ्यांमधून केवळ १२ हजार १८९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. त्यानंतर स्पेशल राऊंड दोनमध्ये ९२० विद्यार्थ्यांना अलॉटमेंट देण्यात आली आहे. त्यामुळे अजूनही ५० टक्के जागा अद्याप रिक्तच आहेत. 
शेतकऱ्याच्या आयटी इंजिनिअर मुलीची ग्रामपंचायतीत ऐटीत एन्ट्री, मतदारांनी केले भरघोस मतदान
मागील काही वर्षापासून महापालिका हद्दीतील शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये ऑनलाईन पद्धतीने अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. जेंव्हापासून शहरात अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन राबविण्यास सुरुवात झाली, तेव्हापासून महाविद्यालयात मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहात आहेत. मागील वर्षी सुमारे चार हजार जागा रिक्त राहिल्या होत्या. यंदा दहावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणवाढीप्रमाणेच उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या वाढलेली आहे. त्यात फेरपरीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची भर पडली आहे. तरीही यंदा पंधरा हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त राहाण्याची शक्यता आहे. त्यात विशेषतः लहान महाविद्यालये व शाळांना जोडलेली कनिष्ठ महाविद्यालयांना रिक्त जागांचा सर्वाधिक फटका बसत आहे. 
आपची महाराष्ट्रात एन्ट्री; लातूरच्या दापक्याळमध्ये मिळविली सत्ता, अरविंद केजरीवालांनी मराठीत दिल्या शुभेच्छा

वाणिज्य, कला शाखेच्या  सर्वाधिक जागा रिक्त 
मनपा परिसरातील विद्यार्थ्यांचा सर्वाधिक कल हा विज्ञान शाखेतील प्रवेशाकडे असल्याचे दिसत आहे. त्यामुळे मागील काही वर्षाप्रमाणेच यंदा कला आणि वाणिज्य शाखेच्या जागा रिक्त राहाण्याची शक्यता आहे. शाळांना जोडलेले कनिष्ठ महाविद्यालयांना विद्यार्थी मिळत नसल्यामुळे त्यांच्या समोर आर्थिक प्रश्न निर्माण होत आहे. दरवर्षी मोठ्या महाविद्यालयांना वाढीव तुकड्या अतिरिक्त जागा मंजूर होतात. त्यामुळे लहान महाविद्यालयांसमोरील प्रश्न सुटत नसल्याचे कनिष्ठ महाविलयांच्या प्राचार्यांनी सांगीतले.
 
Edited - Ganesh Pitekar