सूरत अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना पंतप्रधानांकडून दोन लाखांची मदत!

Primary tabs

नवी दिल्ली : गुजरातच्या सूरतमध्ये एका फुटपाथवर झोपलेल्यांना ट्रकनं चिरडल्यानं तब्बल १५ मजुरांना प्राण गमवावे लागलेत. सूरत जिल्ह्याच्या कोसंबामध्ये हा अपघात घडला. या घटनेवर पंतप्रधान यांनीही दु:ख व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांना आणि जखमींना मदत जाहीर केलीय. 80339504पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूरतच्या या अपघातावर दु:ख व्यक्त केलंय. 'सूरतमध्ये घडलेल्या दुर्घटनेत लोकांनी प्राण गमावणं दु:खद आहे. माझ्या संवेदना पीडित कुटुंबासोबत आहेत. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी कामना करतो' असं पंतप्रधान मोदींनी म्हटलंय.

80340019 सोबतच मृतांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत दिली जाईल तसंच जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत मिळेल, असं पंतप्रधान कार्यालयाच्या ट्विटर अकाउन्टवरून ट्विट करण्यात आलंय.

80341599 मंगळवारी पहाट सूरतपासून जवळपास ६० किलोमीटर अंतरावर असलेल्या कोसंबा गावानजिक ही घटना घडली. सूरत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातातील मृतांची संख्या आता १५ वर पोहचलीय. अपघातात गंभीर जखमी झालेल्या आणखी तीन जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 80342765अनियंत्रित झालेल्या ट्रकखाली चिरडले गेलेले सगळे जण गरीब मजूर आहेत. राजस्थानातून पोटापाण्यासाठी ते गुजरातमध्ये स्थलांतरीत झाले होते. मजुरी करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. 80344261मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट