ते मला ठार मारू शकतात, पण आरोप करू शकत नाहीः राहुल गांधी

Primary tabs

नवी दिल्ली: नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांना पाठिंबा दर्शवत कॉंग्रेस नेते राहुल गांधी ( rahul gandhi ) यांनी हे कायदे शेती संपवण्यासाठी बनवण्यात आल्याचा आरोप केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ( pm modi ) किंवा इतर कोणाला आपण घाबरत नाही. केंद्र सरकारने संपूर्ण कृषी क्षेत्र दोन किंवा तीन भांडवलदारांच्या ताब्यात दिले आहे. कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणारे शेतकरीही असाच आरोप करत आहेत, असं म्हणत राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. कृषी क्षेत्राचा नाश करण्यासाठी नवीन कृषी कायदे केले गेले आहेत. आंदोलनावर ठाम असलेल्या शेतकऱ्यांना १०० टक्के समर्थन करतो. देशातील प्रत्येक व्यक्तीने शेतकऱ्यांना पाठिंबा द्यायला हवा, कारण ते आपल्यासाठी लढत आहेत, असं राहुल गांधी म्हणाले. शेतकरी आणि नवीन कृषी कायद्यांविषयी एक पुस्तिका प्रकाशित करण्यात आली. यावेळी राहुल गांधी बोलत होते. कायदे पूर्ण मागे घेण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही, असं ते म्हणाले. अरुणाचल प्रदेशात चीनने गावबांधल्याच्या वृत्तावरून राहुल यांनी प्रत्युत्तर दिलं. 'राहुल गांधी काय करतात हे सर्व शेतकर्‍यांना माहिती आहे. नड्डाजी भट्टा परसौलमध्ये नव्हते. माझं स्वतःचं एक व्यक्तिमत्त्व आहे. मला नरेंद्र मोदी किंवा इतर कोणाचीही भीती नाही. ते मला हात लावू शकत नाहीत, पण ते मला ठार मारू शकतात. मी देशभक्त आहे आणि देशाचे रक्षण करेन, असं राहुल गांधी म्हणाले. 'मे २०११ मध्ये उत्तर प्रदेशच्या भट्टा परसौलमध्ये भूसंपादनादरम्यान झालेल्या हिंसाचार आणि कथित बलात्काराच्या संदर्भात राहुल गांधी यांनी ही प्रतिक्रिया दिली.farmers protest : शेतकरी आणि सरकारमध्ये आता बुधवारी बैठक; कृषीमंत्री बोलले...२६ जानेवारीला 'ट्रॅक्टर रॅली', सर्वोच्च न्यायालयात सुनावणी टळलीसर्वोच्च न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत केंद्र सरकारच्या नवीन तीन कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीला ११ जानेवारीला स्थगिती दिली. या प्रकरणी पेच सोडवण्यासाठी न्यायालयाने एक समिती स्थापन केली होती. पण न्यायालयाने स्थापन केलेल्या समितीत नवीन कृषी कायद्यांचे समर्थक आहेत. यामुळे या समितीशी चर्चा करणार नाही, सरकारशी करू असं शेतकरी संघटनांनी स्पष्ट केलं. शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी आणि केंद्र सरकारमधील कृषी कायद्यांवरील चर्चेची नववी फेरीही निष्फळ ठरली. तिन्ही कायदे रद्द करण्याऐवजी त्यामध्ये सुधारणा करण्याचा सरकारचा आग्रह आहे. तर कृषी कायदे रद्द होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं शेतकऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.ते मला ठार मारू शकतात, पण हात लावू शकत नाहीत, शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट