घरात घुसून मुलाला बेदम मारहाण, आईला नीट समजावून सांग नाही तर खल्लास करु असे म्हणत मारेकरी पसार 

Primary tabs

उमरगा (जि.उस्मानाबाद) : जिजाऊ  ब्रिगेडच्या प्रदेश महासचिव सारिका अविनाश अंबुरे यांच्या घरात घुसून अनोळखी व्यक्तींनी मुलाला मारहाण करून साहित्याची नासधूस केली. मुलाला मारहाण करुन आईला ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार सोमवारी (ता.१८) दुपारी तीनच्या सुमारास घडला. या बाबतीत पोलिसांनी सांगितले की, जिजाऊ ब्रिगेडच्या महासचिव असलेल्या अंबुरे या पती व दोन मुलासह शहरातील मुगळे हॉस्पिटलच्या मागील बाजूस संजय ममाळे याच्या बंगल्यात किरायाने राहतात. सोमवारी दुपारी अनोळखी व्यक्ती त्यांच्या घरात घुसून सर्वेश या मुलाला मारहाण केली.
आपची महाराष्ट्रात एन्ट्री; लातूरच्या दापक्याळमध्ये मिळविली सत्ता, अरविंद केजरीवालांनी मराठीत दिल्या शुभेच्छा
मुलांच्या गळ्यावर अंगावर ओरखडे ओढले आणि घरातील  एलईडी फोडला. घरातील फोटो फ्रेम फोडुन इतर घर साहित्याची मोडतोड करून सर्वेश याला तुझ्या आईला नीट समजावून सांग नाही तर खल्लास करु असे धमकी देऊन मारेकरी पसार झाले. बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या सर्वेशने कसेबसे आई, वडिलांना फोन लावुन ही माहिती सांगितली. आई सारिका  घराकडे गेल्यानंतर घराला बाहेरची कडी लावून मारेकरी पळून गेल्याचे लक्षात आले. सर्वेश शुद्धीवर आल्यानंतर ही माहिती दिली. दोन व्यक्ती तोंडाला रूमाल बांधून घरात घुसून असा प्रकार केला असल्याचे सर्वेश यांनी सांगितले.
मंगलाष्टका झाल्या, सात फेरेही उरकले आणि सासरी जाताना नवऱ्या मुली झाल्या फरार
सध्या सर्वेश यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान अंबुरे या उमरगा पंचायत समितीत कृषी अधिकारी आहेत तर अविनाश अंबुरे भूम पंचायत समितीत कृषी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.  अचानक तेही भरदिवसा घरात घुसून मारहाण करणारे ते व्यक्ती कोण होत्या. याचा तपास करण्याचे पोलिसासमोर आव्हान आहे. या प्रकरणी सारिका अंबुरे यांच्या फिर्यादीनुसार दोन अनोळखी व्यक्तीच्या विरोधात सोमवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार लक्ष्मण शिंदे तपास करीत आहेत.
मराठवाड्याच्या ताज्या बातम्या वाचा
सीआयडी तपासाची मागणी
भरदिवसा झालेल्या या प्रकरणाने त्यांचा मुलगा व अंबुरे कुटुंबिय भयभयीत झाले असून  मुलासह  कुटूंबाला धोका निर्माण झाला आहे. प्रकरणातील आरोपीला तातडीने पकडून सीआयडी अथवा वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत  चौकशी  करावी. तसेच अंबुरे कुटुंबियांना पोलिस संरक्षण देण्यात यावी अशी मागणी मराठा सेवा संघाचे विभागीय  सचिव भास्कर वैराळे, तालुका सचिव अनिल सगर, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाउपाध्यक्ष प्रदीप भोसले, तालुकाध्यक्ष प्रदीप जाधव, उपाध्यक्ष आण्णासहेब पवार, सचिव पप्पु माने, सचिन आळंगे, वजीर शेख, मराठवाडा साहित्य परिषदेचे विभागीय उपाध्यक्ष प्रा. किरण सगर, उमरगा शाखाध्यक्ष प्राचार्य डॉ. दिलीप गरुड, उपाध्यक्ष अरुण जाधव, सदस्य अविनाश काळे , प्रा.अभयकुमार हिरास, प्रा. अवंती सगर, पाशा कोतवाल, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाउपाध्यक्ष सुनंदा माने, जिल्हा प्रवक्त्या रेखा सूर्यवंशी,  तालुकाध्यक्ष रेखा पवार, राऊ भोसले, श्रीदेवी बिराजदार, संध्या शिंदे, लता भोसले आदींनी तहसीलदार संजय पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
 
Edited - Ganesh Pitekar