योगीराज संत श्री गजानन महाराज - नवीन संकेतस्थळाचे अनावरण

Primary tabs

५ जुलै २०२०, गुरुपौर्णिमेच्या शुभदिवशी ॐ श्री गजानन गुंजन विश्व परिवाराने तयार केलेल्या श्री गजानन महाराज (शेगांव) यांच्यावरील संकेतस्थळाचे अनावरण श्री कृपेने झाले. सुविख्यात आणि श्रींच्या निस्सीम भक्त आदरणीय सुमतीताई बापट, आदरणीय विनय जोशी आजोबा, श्रीमती विद्याताई पडवळ आणि डॉ. गजानन खासनीस यांच्या हस्ते अनावरण सोहळा इंटरनेटच्या माध्यमातून साकार झाला. चला संकेत स्थळाला भेट देऊयात: https://shreegajanangunjan.org

संकेतस्थळावरील माहिती मराठी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे. श्रींचे प्रकटीकरण, संजीवन समाधी, श्रींचे एकनिष्ठ भक्त, शेगांव संस्थान आणि इतर वाङमय, हे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सहज पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. यातच ८० पेक्षा अधिक त्या ठिकाणांचे छायाचित्रे आहेत जिथे श्रींनी मुक्त संचार करून अनेक भक्त उद्धरिले. तसेच आदरणीय सुमतीताई बापट यांच्या सुमधुर वाणीतून श्री गजानन विजय ग्रंथ ऑडिओ स्वरूपात आपण श्रवण करू शकता. संकेतस्थळावर मराठी आणि इंग्रजी भाषेत श्री गजानन विजय ग्रंथ (पोथी) उपलब्ध असून आरती, दुर्वांकुर आणि काही स्तोत्रे यांचाही समावेश आहे. श्री गजानन गुंजनचे जुने व वेळोवेळी प्रकाशित केली जाणारे अंक आपण जरूर वाचावेत.

ॐ श्री गजानन गुंजन विश्व परिवार हा संत शिरोमणी श्री गजानन महाराज (शेगांव) यांच्या भक्तांचा एक विशेष आंतरराष्ट्रीय समूह. पंचखंडातील भक्तांनी, देशांचे व सीमांचे बंधन ओलांडून, एकत्रपणे, कुठलीही आसक्ती न ठेवता, निरपेक्षपणे, केवळ माऊलींविषयीची भक्ती व अध्यात्मिक वृत्ती वृद्धिंगत व्हावी या उद्देशाने विविध कार्यक्रमांचे आयोजन ई-माध्यमातून करत आहे. संकेतस्थळावर युट्युब वर पूर्वी आयोजिले कार्यक्रम सोप्या रीतीने मांडले आहेत. वेगवेगळ्या देशातील श्रींच्या हजारो भक्तांनी हे कार्यक्रम पाहिले असून आपणही त्यांचा लाभ घेऊ शकता.

संकेतस्थळावर श्रींचे आलेले जागृत अनुभव, युट्युब चॅनेल आणि फेसबुक पेजची लिंक असून अधिक जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करून सामील व्हावे. सदर संकेतस्थळाची सेवा श्रीचरणी अर्पण करत असून जास्तीत जास्त भाविकांनी या अनमोल संग्रहाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती.

|| श्री गजानन जय गजानन ||