बातम्या.कॉम या वेबसाईटचे मायबोली वेबसमूहात हार्दिक स्वागत !

Primary tabs

by webmaster / Jul 18, 2012 / comments

नमस्कार बातम्या वाचक !

आजपासून बातम्या.कॉम ही वेबसाईट मायबोली वेबसमुहाचा भाग झाले आहे. तुमच्या सगळ्यांचं मायबोली परिवारात हार्दिक स्वागत.

गेल्या काही वर्षांत बर्‍याच मराठी वेबसाईट निघाल्या, पण त्यातल्या बहुतेक संकेतस्थळांनी कथा/कविता/ललित लेख/प्रकाशचित्रे/सोशल नेटवर्किंग यांवर भर दिला. कुठल्याही प्रकारचे सोशल नेटवर्किंग नसलेली, फक्त बातम्यांचे एकत्रीकरण करणारी बातम्या.कॉम ही वेबसाईट या पार्श्वभूमीवर नक्कीच वेगळी उठून दिसते. आणि तुम्हा वाचकांनी भरभरून दिलेल्या प्रतिसादावरून ती यशस्वी होते आहे, हे सिद्धही होतं.

१९९६ पासून सुरु असलेली मायबोली.कॉम जगातली सगळ्यात जुनी मराठी वेबसाईट आहे. गेल्या काही वर्षात त्यात आणखी वेबसाईटची भर पडली असून आता तो एक वेबसमुह झाला आहे आणि आजपासून बातम्या.कॉम त्याच मायबोली वेबसमुहाचा एक भाग झाली आहे.

मायबोलीवर सध्या असलेला बातम्या विभाग, इथल्या तुलनेनं अगदीच प्राथमिक अवस्थेत आहे. तो बंद केला जाईल. त्या ऐवजी तिथल्या वाचकांना बातम्या.कॉमच्या सुविधांचा लाभ घेता येईल. इथेही बर्‍याच नवीन सुविधा/बदल करण्याचा विचार आहे. पण मायबोलीने नेहमीच "आधी केले, मग सांगितले" हे धोरण पाळले आहे त्यामुळे त्याबद्दल आताच जास्त काही लिहणे योग्य होणार नाही.

तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत

मायबोली टीम
http://www.maayboli.com