नमस्कार बातम्या वाचक !
आजपासून बातम्या.कॉम ही वेबसाईट मायबोली वेबसमुहाचा भाग झाले आहे. तुमच्या सगळ्यांचं मायबोली परिवारात हार्दिक स्वागत.
गेल्या काही वर्षांत बर्याच मराठी वेबसाईट निघाल्या, पण त्यातल्या बहुतेक संकेतस्थळांनी कथा/कविता/ललित लेख/प्रकाशचित्रे/सोशल नेटवर्किंग यांवर भर दिला. कुठल्याही प्रकारचे सोशल नेटवर्किंग नसलेली, फक्त बातम्यांचे एकत्रीकरण करणारी बातम्या.कॉम ही वेबसाईट या पार्श्वभूमीवर नक्कीच वेगळी उठून दिसते. आणि तुम्हा वाचकांनी भरभरून दिलेल्या प्रतिसादावरून ती यशस्वी होते आहे, हे सिद्धही होतं.